

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तान कधीही सुधारणारा देश नाही. भारताला कसे पाण्यात बघायचे आणि देशाचे तुकडे कसे करायचे यासाठीच ते प्रयत्न करतात. पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांना मिळालेले आहेत त्यांच्या कधीही बंद होणार नाहीत. त्यामुळे भारताला आत्मनिर्भर आणि एकजूट राहावे लागेल. असे वक्तव्य निवृत्त लेफ्टनंट जर्नल संजय कुलकर्णी यांनी डोंबिवली येथे केले.
१५ जानेवारी १९४९ रोजी फिल्ड मार्शल लेफ्टनंट जनरल के एम करिअप्पा यांनी ब्रिटिश कमांडर इन चीफ फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारताचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून भारतीय सैन्याचा पदभार स्वीकारला. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या दिवसाने ७५ वर्षात पदार्पण केले आहे. याच निमित्ताने डोंबिवली पूर्व येथील फडके रस्त्यावर आज निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपला सियाचीनचा अनुभव उपस्थित नागरिकांसमोर मांडला. यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेबद्दल सांगताना ही योजना देशाच्या भवितव्यासाठी उत्तम असल्याचे सांगत आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे असल्याचे सांगितले. देशातील अनेक तरुण – तरुणींना यामध्ये संधी मिळेल असे सांगताना या योजनेमुळे भारताच्या आर्मीचे वय देखील तरुण राहते असे त्यांनी नमूद केले. या सर्व तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासारखे निवृत्त अधिकारी आहेत. त्यामुळे आपण मेहनत करू आणि यातून देश घडवू असे त्यांनी सांगितले. तर देशातील आर्मी ही पाकिस्तान आणि चीन पेक्षाही खंबीर आहे. आपल्याला कोणत्याही सरकारचा दबाव नाही. बाकीच्या देशात राजकीय पक्ष आर्मी मध्ये अधिक हस्तक्षेप करतात पण आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे आपला देश अर्मीच्या बाबतीत अधिक सक्षम आहे असे वक्तव्य त्यांनी केले. इतकेच नव्हे तर माझ्या ४० वर्षाच्या नोकरीच्या काळात आणि त्यानंतरही मी अशा पद्धतीचा कार्यक्रम पाहिला नाही असे त्यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक जण शांततेत झोपतो याचे कारण सैनिक आहेत. भारताला १९४७ ला स्वतंत्र मिळालं. मात्र इंग्रजांनी सैन्य सुपूर्त केले नाही. हे दोन वर्षाने फ्रान्सिस बुचर यांनी सुपूर्त केले. देशात पहिल्यांदा हा आर्मी दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात डोंबिवली शहरात साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या अस्तित्वाचा कार्यक्रम आहे. डोंबिवली शहरचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवर शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. आता ही ओळख देशप्रेमी डोंबिवलीकर अशी देखील होणे गरजेचे आहे. आपल्याला भारत माते बद्दलचा अभिमान प्रत्येकामध्ये प्रेरित करायचा आहे. आपण घेत असलेला श्वास सैनिकांमुळे घेत आहोत याची जाणीव प्रत्येकाला करून द्यायची आहे . सैनिकांची आठवण ठेवून अभिवादन करण्याची प्रथा संपूर्ण देशात डोंबिवलीकरानी प्रथम सुरू केल्याचा मला अभिमान आहे असे वक्तव्य मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले. डोंबिवलीकर एका सांस्कृतिक परिवार, पेंढारकर महाविद्यालय, सिस्टर निवेदिता आणि ओमकार इंटरनॅशनल शाळा या सगळ्या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. नवी पेंढारकर महाविद्यालय, ओमकार इंटरनॅशनल शाळ आणि सिस्टर निवेदिता शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड सादर केली तर गाडा सर्कल येथे असणाऱ्या शहीद विनय कुमार सच्चान यांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर संजय कुमार संजय कुलकर्णी यांना पेंढारकर महाविद्यालयाकडून गार्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला.