ठाण्यात बेकायदेशीर, बनावट मद्यसाठा पकडला; भरारी पथकाची कारवाई

ठाण्यात बेकायदेशीर, बनावट मद्यसाठा पकडला; भरारी पथकाची कारवाई
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा राज्यात विक्री करण्यास बंदी असलेला लाखोंचा गोवा राज्यातील बेकायदेशीर व बनावट मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहापूर तालुक्यात पकडला. यावेळी पथकाने 6 लाख 93 हजार रुपये किमतीचा 91 बॉक्स बनावट तर 9 लाख 59 हजार रुपये किमतीचा 123 बॉक्स गोवा गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला बेकायदेशी मद्य जप्त केले. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.

गणेशोत्सव व इतर सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध, नकली आणि परराज्यातून येणार्‍या मद्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक मद्य तस्करीवर नजर ठेवून होते. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा रोड, विरवाडी येथे एका पत्र्याच्या शेड मध्ये अवैद्य मद्यसाठा लपवून ठेवण्यात आला असल्याची माहिती पथकास मिळाली होती.

या माहितीच्या अनुषंगाने पथक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास भरारी पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका पत्र्याच्या शेड मध्ये मोठा मद्यसाठा आढळून आला. त्यात 6 लाख 93 हजार रुपये किमतीचा 91 बॉक्स बनावट मद्य आढळून आले. तर 9 लाख 59 हजार रुपये किमतीचा 123 बॉक्स गोवा गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला बेकायदेशी मद्यसाठा मिळून आला. या प्रकरणी वैभव पुंडलिक शेलार (31) यास अटक करण्यात आली आह

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news