अल्पवयीन चोरांचा कारनामा चव्हाट्यावर; डोंबिवलीत 21 मोबाईलसह 10 महागड्या सायकली हस्तगत

अल्पवयीन चोरांचा कारनामा चव्हाट्यावर; डोंबिवलीत 21 मोबाईलसह 10 महागड्या सायकली हस्तगत
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: डोंबिवलीतील दोन अल्पवयीन चोरट्यांनी 21 मोबाईल आणि 10 दुचाक्या चोरल्याचा प्रकार रामनगर पोलिसांनी उघडकीला आणला आहे. शहरात अल्पवयीन मुलेही सराईत चोर असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. चोरलेल्या मुद्देमालाची किंमत 3 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे दोन्ही अल्पवयीन मुले सराईतपणे चोर्‍या करत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.

रामनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार विशाल शंकर निवळे, वैजनाथ रावखंडे, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे हे शनिवारी गस्त घालत होते. त्यावेळी दोन संशयित अल्पवयीन मुले दुचाकीवरून नांदिवली रोडने पराग बंगल्यासमोरून जात होती. ही मुले दुचाकी चालविताना मौजमस्ती करत होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांची दुचाकी पोलिसांनी अडवली. पोलिसांना अचानक समोर पाहून ती दोन्ही मुले घाबरली.

पोलिसांनी लाडाने या दुचाक्या तुमच्या आहेत का? असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी या दुचाक्या आमच्या नसून चोरीच्या आहेत असल्याची कबुली दिली. या मुलाच्या पँटचे खिसे तपासले असता त्यात त्यांना महागड्या किंमतीचे मोबाईल आढळून आल्याने पोलीसही चक्रावले. पोलिसांनी दोन्ही मुलांना दुचाक्यांसह पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या पालकांना पोलिसांनी बोलावून घेतले. पालकांच्या उपस्थितीत पोलिसांनी दोन्ही मुलांची चौकशी केली. त्यावेळी या दोन्ही मुलांनी आयरे गाव भागातील एका
घरातून आम्ही ओपो, विवो, रेडमी, पोको कंपनीचे एकूण 21 मोबाईल चोरले असल्याची कबूली दिली.

आपण वापरत असलेली दुचाकी ठाकुर्लीच्या 90 फुटी रस्त्यावरील डी मार्ट दूकानासमोरुन चोरली असल्याचे सांगितले. या मुलांनी 10 दुचाक्या शहराच्या विविध भागातील सोसायटीच्या आवारांसह रस्त्यावरुन चोरल्या आहेत. चोरलेला सर्व मुद्देमाल दोन्ही मुलांकडून जप्त करण्यात आला आहे.

अनेक गुन्ह्यांची होणार उकल

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरात मोबाईल, सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. वारंवार घडणार्‍या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा तात्काळ तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार रामनगर पोलिसांनी तपास करून या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होणार असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news