Thane News : कल्याण येथे लस कल्याणाची कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग
कल्याण : लस कल्याणाची या उपक्रमाअंतर्गत कल्याण पश्चिम रोहिदास वाडा येथे 10 डिसेंबर रोजी घेतलेल्या अवेअरनेस कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा सहभाग मिळत असून 120 नागरिक या मोहिमेसाठी सक्रीय झाले आहेत. झेड एम क्यू डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने मोफत नव्या तंत्रज्ञानावर आधारित विविध कार्यक्रम घेतले जातात. लस कल्याणाची या उपक्रमाअंतर्गत सर्व समाजामध्ये लसिकरणाचे फायदे याबाबत समूपदेशन केले जात आहे.
10 डिसेंबर रोजी रोहिदासवाडा कल्याण पश्चिम येथे नागरी समूदाय भेटीचा कार्यक्रम दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूज यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश लसिकरणाबाबत जागरूकता वाढविणे, शंकांचे निरसन करणे, गैरसमज आणि भीती दूर करणे, अशी मोहीम हाती घेण्यात आली असून लसिकरणाला यामुळे प्रतिसादही वाढत आहे. प्रत्येक भागामध्ये ओपीनीयन लीडर्सच्या माध्यमातून समूपदेशनाचे मजबूत जाळे तयार करून मुले पालक यांना लसिकरणासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच सर्व कुटुंबाना आवश्यक ती मदतही पुरवली जात आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सुश्री शोभा पहाड, क्षेत्र समन्वयक झेड एम क्यू डेव्हलपमेंट यांनी सुरुवातीला स्वागतपर भाषण केले. त्यांनी लस कल्याणाची उपक्रमाची उद्दिष्टये, ध्येय पूर्ती याचे महत्व सांगत समूदाय नेतृत्वाचे मॉडेल आपण तयार करत असल्याचे स्पष्ट केले. लोकांमध्ये अवेअरनेस वाढवावा म्हणून व्हॉट्सअॅप लर्निंग गु्रप सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.
लोकांशी देवाणघेवाण, समन्वय या माध्यमातून प्रभावी सक्षमीकरण हे उपक्रम नागरिकांसाठी हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे समन्वयक रहीम खान यांनी क्षेत्रीय उपक्रमाची माहिती दिली. लस कल्याणाची या उपक्रमाला 120 समूदायांमधील नेतृत्वांचा सहभाग मिळत असल्याबद्धल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी काही समुपदेशकांनी आपले अनुभव कथन केले. फरिदा यांनी दोन वर्षांच्या मुलींना 9 महिन्यांचा डोस दिला गेला नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसिकरण प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि या कुटुंबाला लस कल्याणाची या उपक्रमात सामील करून घेतले.
उषाताई यांनी वैयक्तिक कारणामुळे साशंक असलेल्या एका कुटुंबाशी विश्वासाचे नाते निर्माण करून त्यांना मुलींचे लसिकरण नियमीत सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. तर दुर्गा यांनी पायातील दोषासह जन्मलेल्या 45 दिवसांच्या बाळाच्या पालकांना लसिकरणाबाबतच्या त्यांच्या भीतीवर मात करण्यास मदत केली. आणि सुरक्षितपणे लसिकरण करून घेतले. सोनाली यांनी पूर्वीच्या लसिकरणानंतर गाठ आल्याने चिंताग्रस्त असलेल्या कुटुंबाला हे दुष्परिणाम सामान्य असल्याचे सांगितले आणि लसिकरणासाठी प्रोत्साहित केले. या अनुभवातून लोकजागृतीचे काम अधिक गतिमान करण्याचे आणि विश्वास निर्माण करण्याच्या मोहिमेला गती आल्याचे स्पष्ट केले.
या मोहिमेसाठी डॉ. आंबेडकर हेल्थ सेंटरचे वैद्यकीय अधिकारी पल्लवी सोनावणे यांनी माहितीपूर्ण अशी सत्रे घेउन महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी लसिकरणाचे महत्व, प्रचलित गैरसमज तसेच काही प्रमाणात येणार्या रिअॅक्शन याचे व्यवस्थापन आणि लसिकरणाबाबत मिळणारे दीर्घकालीन लाभ याबाबतची माहिती दिली. यामुळे लसिकरण प्रक्रियेचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
कार्यक्रमात लसिकरण विषयक दहा मुद्द्यांचा बहुपर्यायी प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. आणि प्रश्नमंजूषेची योग्य उत्तरेही दिली. चर्चेतही मोठा सहभाग दाखवला. माहितीपत्रके आणि दृष्य साधने वापरून संकल्पना अधिक स्पष्ट केल्या. समन्वयकांच्या माध्यमातून सहभागी नागरिकांना गौरवचिन्हे देण्यात आली. यावेळी उपस्थितांची चहा-पान व्यवस्था, परस्पर संवाद आणि सहकार्य आणि अनुभवाची देवाणघेवाण अधिक सुलभ?झाली. तसेच व्हॉट्सअॅप चॅनेल गटात सामील होण्यासाठी क्यू आर कोडचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 50 समन्वय सदस्य सहभागी झाले. यातून लसिकरणाविषयी जागरूकता करणे अधिक सुलभ झाले. या कार्यक्रमाला डॉ. पल्लवी सोनावणे, आरोग्य सेविका करुणा शेलार, सरिता आखरेकर, आशा कार्यकर्ती रिजवाना, पुढारी न्यूजचे अनूप नायर आणि त्यांचे सहकारी, झेड एम क्यू डेव्हलपमेंटचे रहीम आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. या सर्वांच्या सहभागामुळे वैद्यकीय अधिकारी उपक्रमाला अधिक व्याप्ती आली.

