Covid-19 Hong Kong Singapore Updates
Covid-19 Hong Kong Singapore UpdatesFile Photo

Covid-19 Thane News | ठाण्यात कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९ 

Published on

ठाणे :  ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या चार  दिवसात कोरोनाचे २० रुग्ण आढळले असून त्यापैकी एका २१ वर्षीय तरुणाचा आज मृत्यू झाला आहे. तो गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे रुग्णालयात गुरुवारी दाखल होता. शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि आज (दि.२४) सकाळी त्याचे निधन झाल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे. दुसरीकडे ठाण्यात आज नवीन ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 

कोरोना रुग्ण आढळण्यास सुरूवात झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी चेतना नितील यांनी दिली. त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात असून, आरटीपीसीआरची सुविधाही रुग्णालयात उपलब्ध असल्याचेही रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. १७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते गृह विलगीकरणात असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

दुर्दैवाने कोरोनाबाधित एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याला गंभीर स्वरूपाचा मधुमेह झाला होता. त्यामुळे नक्की कशामुळे त्याचा मृत्यू झाला, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news