म्हाडा भरतीसाठी का होणार दोनदा परीक्षा?

म्हाडा भरतीसाठी का होणार दोनदा परीक्षा?
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

म्हाडा मधील नौकर भरतीसाठी परीक्षा होणार आहेत. यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण बाहेर पडले. यावरून वादंग सुरू असताना म्हाडा भरतीमध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर आल्या आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेत नामदार आव्हाड यांनी दोषींना सोडले जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर आता परीक्षा रद्द न करता पुन्हा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्हाडा मधील परीक्षेत होणाऱ्या गडबडीला वेळीच आळा घेतला जाईल, असे नामदार आव्हाड यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news