

नेवाळी : उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी रिया बर्डे (Riya Barde) नामक तरुणीला बांग्लादेशी आणि बोगस कागदपत्रे बनवण्याचा ठपका ठेवत तिला अटक करण्यात केली आहे. मात्र ती बांगलादेशी असल्याचे पोलोसांचे आरोप तिच्या वकिलांनी धुडकावून लावले आहेत. रियाकडे असलेले भारतीय नागरिकत्वाचे कागदपत्र देखील तिच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले आहेत. न्यायालयाने देखील तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेवाळीमधील एका चाळीत बांगलादेशी कुटुंब राहत असल्याची माहिती सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र सदरची अटक केलेली तरुणी बांग्लादेशी नसल्याचा तिच्या वकिलांनी सांगितलं आहे. याबाबीचे तिचे भारतातील शिक्षणासह वास्तव्याचे पुरावे देखील पोलिसांसह न्यायालयात देण्यात आले आहेत. रिया बर्डे आणि प्रशांत मिश्रा यांचे पैशाच्या व्यवहारातून भांडण झाली आहेत. त्यामुळे त्याने तक्रारी अर्ज पोलिसांकडे केल्याचा आरोप रियाच्या वकिलांनी केला आहे. रियाचे कुटुंबिया भारतीय सैन्यात वा पोलीस खात्यात होते, अशी माहिती देखील तिच्या वकिलांनी दिली आहे. मात्र सर्वत्र सोशल मीडियावर पॉर्नस्टार नावाने रियाचे फोटो व्हायरल झाले आहेत. शुक्रवारी रियाला उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. रियाला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.