Water Crises Thane : कल्याणकरांचा पाण्यासाठी टाहो

ठाणे : : कल्याणकरांचा पाण्यासाठी टाहो; महिलांनी केडीएमसीसमोर घागर फोडत व्यक्त केला संताप
कल्याण, ठाणे
महिलांनी मडके फोडून केडीएमसीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध करीत संताप व्यक्त केला.pudhari news network
Published on
Updated on

कल्याण : कल्याण पश्चिमेतील काही भागांमध्ये पाणी पुरवठा वितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर घागरभर हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागण्याची वेळ प्रशासनाच्या सावळा गोंधळ कारभारामुळे आली आहे. अनेकदा तक्रारी करूनही केडीएमसीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत सोमवारी (दि.30) रोजी शेकडो महिलांनी केडीएमसी मुख्यालयावर रिकामे घागर घेऊन मोर्चा काढला. यावेळी महिलांनी मडके फोडून केडीएमसीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध करीत संताप व्यक्त केला.

कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा, चिकणघर, काळातलाव आदी भागांतील नागरिकांना पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठा समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणी समस्येबाबत नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी पदरी मात्र आश्वसन दिले जाते. आणि समस्या कायम याबाबत प्रशासनकडून ठोस काहीच कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांनी सांगीतले. केडीएमसीच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणी टंचाई आणि दूषित पाण्याचा सामना करावा लागतो, असा आरोप करत शेकडो संतप्त महिलांनी केडीएमसी मुख्यालयावर मडके मोर्चा काढला. चिकणघर, काळा तलावचा सर्वांगीण विकास खुंटला, पाणी व रस्त्याकरीता जनतेचा उद्रेक मोर्चा. असे बँनर हातात घेऊन महिलांनी घोषणाबाजी करत मडके फोडून निषेध नोंदवला. यावेळी बोलताना महिलांनी पाणी बिले वसूल केली जातात मात्र पाणी दिले जात नाहीत,पाणी बिले उशिराने भरली तर थकीत बिलांवर व्याज लावले जाते आम्हाला महिनोंमहिने पाणी टंचाईला समारे जावे लागत आहे.

पाणीटंचाई सुटणार केव्हा ?

पाणी टंचाई प्रश्न कधी सुटणार अशी संतप्त प्रतिक्रिया खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष उमेश बोरगावकर यांनी दिली. या मोर्चानंतर ही प्रशासनास जाग नाही आली व जलद योग्य कार्यवाही नाही केली तर संबंधित अधिकार्‍यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बसू दिले जाणार नाही, असा इशारा उमेश बोरगांवकर यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news