

कसारा : शाम धुमाळ
सद्या कडक उन्हाळा असल्यामुळे रेल्वे असो वा महामार्ग प्रवास करणारा प्रत्येक जण आपली तहान भगवण्यासाठी आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कॅन्टीन, हॉटेल, ढाबा याठिकाणी उपलब्ध असलेले सीलपॅक पाणी बाटली विकत आपले परंतु अर्थ पूर्ण व्यवहार करीत आपल्या पाणी बाटली प्लांट ला मंजुरी मिळवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ मात्र खेळाला जातोय.
मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटा च्या पायथ्याशी असलेल्या बाबा का ढाबा या ठिकाणी एका प्रवाशा ने पाणी बाटली विकत घेण्यात आली या दरम्यान हॉटेल चालकाने फ्रिज मधून क्लाऊड 9 (cloud 9) ही बाटली आपल्या गाडीत घेऊन जात असताना प्रवाशा च्या लक्षात आले की या सील पॅक बाटलीत काही तरी पाण्यात तरंगते त्यानुसार प्रवाशा ने बाटली हलवून बघितली तर त्यात प्लास्टिक सदृश्य कचरा असल्याचे दिसून आल्याने प्रवाशाने हॉटेल चालकांशी वाद घातला हॉटेल मध्ये कसारा येथील ऋषभ ट्रेडर्स येथून सदर पाणी बॉक्स वितरित केले जातं असल्याचे सांगितले हॉटेल चालकांशी झालेला वाद कशा मुळे झाला हे अन्य ग्राहकांच्या लक्षात आल्याने त्यांनीही ह्या पाणी बाटली विरोधात् हॉटेल चालकास शिव्यांचा प्रसाद दिला .मात्र याबाबत हॉटेल चालकाने पाणी बाटली च्या कंपनीशी संपर्क केला त्यावेळी त्यांना उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली .परंतु एवढे असताना देखील नियम बाह्य व पूर्ण पणे सिल्ल नसलेले क्लाऊड 09 हे पाणी शहापूर तालुक्यात जादा कमिशन देत विकले जातं असून याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली आहे.
परिणामी एखादी जीवनावश्यक वस्तू मध्ये अशा प्रकारे हलगर्जी पणा होत असेल तर अन्न व औषध प्रशासन कोणत्या आधारे अशा निष्क्रिय प्रोजेक्ट ला मान्यता देते असा प्रश्न निर्माण होत असून या क्लाऊड 9 या पाणी बाटली कंपनी चे ऑडिट होऊन त्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी संबंधित खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे सदर प्रकरणी सब्धीतावर कारवाई करतील का.? दरम्यान या प्रकरणी सदर पाणी बाटली विक्री करण्यास बंदी करण्यात यावी यासाठी मुंबई नाशिक महामार्ग तसेच रेल्वे स्थानकात जनजागृती करण्यात येणार आहे.