ठाणे : मजुरीचे दर भिडले गगनाला; शेतीकामाला मजूर मिळेनात

ठाण्यात मजुरीचे दर गगनाला भिडले, शेतीकामासाठी मजूर टंचाई
Sowing agriculture
समाधानकारक पावसामुळे सारा खाडीपट्टा शिवारात भाताची पेरणी करण्यात येत आहे. file photo
Published on
Updated on

खाडीपट्टा : यंदा पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली आणि आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला आहे. समाधानकारक पावसामुळे सारा खाडीपट्टा शिवार हिरवळीने नटला आहे. येथील शिवारामध्ये भात लावणीची लगबग मोठ्या प्रमाणात दिसून येत असली तरी शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाल्याने याचा ताण शेतकरी वर्गावर पडत आहे. तसेच मजुरीचे दरही गगनाला भिडल्याने ते शेतकन्यांच्याही आवाक्याबाहेरचे असल्याचे दिसून येत आहेत.

दरम्यान गेल्या आठ-दहा दिवसांपासूनच शेतीकामाची लगबग सुरू झाली असून बळीराजा मोठ्या उत्साहाने भात लावणीच्या कामामध्ये व्यस्त झालेला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने सर्वत्र हिरवागार निसर्ग अधिक खुलून आलेला पहायला मिळत आहे.

Summary

दिवसेंदिवस बैलांच्या साह्याने केली जाणारी पारंपारिक नांगरणी कमी होत आहे.

मजूर मिळत नसल्यामुळे त्याचबरोबर मजुरी देखील प्रचंड वाढली असल्यामुळे ट्रॅक्टरने नांगरणी केली जात आहे.

वाढलेल्या मजुरीचा चांगलाच फटका शेतकरी वर्गाला बसला असून ४०० रुपये मजुरी, जेवण, चहा व नाश्ता दिला जात आहे.

भात लावणीच्या कामी पावसाची चांगली बरसात सुरू होती, मात्र थोडा उसंत पावसाने घेतला असला तरी भातलावणी करिता पावसाने चांगली बरसात केली आहे, त्यामुळे शेती कामाने चांगला जोर घरला आहे. नुकतीच भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली असून पारंपरिक गाण्यांनी खाडीपट्टा शिवार गजबजलेला पाहायला मिळत आहे, तर बळीराजा आनंदाने नांगरणे, खणणे व रोप लावणीच्या कामामध्ये व्यस्त झाल्याचे खाडीपट्टयात प्रत्यक्ष फेरफटका मारला असता पाहायला मिळाले.

आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असून शेतीची कामे पूर्ण लावणी नंतर शेतकरी राजा लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले. तर काही शेतकरी वारकरी गावातीलच श्री विठुरायाच्या मंदिरात जाऊन नतमस्तक होऊन पुन्हा शेतीकडे वळतील असेही सांगितले.

दुसरीकडे भात पिकाच्या तरव्यांनी चांगली उभारी घेतली असल्याने सध्या बळीराजा भात लावणीच्या कामात गुंतलेला पाहायला मिळत आहे. तर दिवसेंदिवस बैलांच्या साह्याने केली जाणारी पारंपारिक नांगरणी कमी होत असून मजूर मिळत नसल्यामुळे त्याचबरोबर मजुरी देखील प्रचंड वाढली असल्यामुळे ट्रॅक्टरने नांगरणी केली जात आहे.

यावर्षी जास्त उत्पन्नाची अपेक्षा

सद्या पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी भात लावणीची कामे गतीने सुरू असून दमदार पावसाच्या आगमनाने भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. दुसरीकडे पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले असून शेतात भात लावणीसाठी आवश्यक मुबलक पाणीसाठा देखील झाला आहे. त्यामुळे पिकाला उभारी मिळाली आहे.

मजुरीचा शेतकरीवर्गाला फटका

वाढलेल्या मजुरीचा चांगलाच फटका शेतकरी वर्गाला बसला असून ४०० रुपये मजुरी, जेवण, चहा व नाश्ता त्यामुळे हळूहळू शेतीचे प्रमाण कमी होत चालले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खाडीपट्टयात सध्या शेकडो एकर शेती पिकाविना ओसाड पडून आहे कारण शेतीसाठी होणारा खर्च उत्पन्नापेक्षा मोठ्या प्रमाणात असून परवडणारा नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news