Kalyan Sexual Assault Case | विशाल गवळी व पत्नी साक्षीला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

कल्याणचे बालिका अत्याचार-हत्याकांड प्रकरण
Vishal Gawli and 
Wife Sakshi remanded in judicial custody till January 18
विशाल आणि त्याची साथीदार पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले.Pudhari
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याणमध्ये बारा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीसह पत्नी साक्षीची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 14 दिवस अर्थात 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी विशालसह पत्नी साक्षीला आणखी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. तथापी या प्रकरणाचा बहुतांशी तपास पूर्ण झाल्याने न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे या प्रकरणातील विशाल गवळीचे वकील ॲड. संजय धनके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

सोमवारी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय बालिकेचा अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयीपणे खून करणाऱ्या विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांच्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. शनिवारी सकाळी पोलिसांनी दोघांना कडेकोट बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने पीडीत कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार, ॲड. संजय मिश्रा आणि मारेकरी विशालचे वकील ॲड. संजय धनके यांचे म्हणणे एकून घेतले. पोलिसांनी विशालसह पत्नी साक्षी यांना तपास कामासाठी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती. मात्र या प्रकरणाचा बहुतांशी तपास पूर्ण झाल्याने पोलिसांची मागणी अमान्य करून न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. येत्या 18 जानेवारी रोजी या संदर्भात पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पीडीत कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मारेकरी विशाल गवळी हा पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहे. त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. येत्या 18 जानेवारीला न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे विशालचे वकील ॲड. संजय धनके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या प्रकरणाचा बहुतांशी तपास पूर्ण झाला आहे. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. विशालचे वकीलपत्र घेतल्याने आपणासह कुटुंबीयांना काही स्वयंघोषित जागल्यांकडून दररोज लक्ष्य केले जात आहे. या संदर्भात आपण पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

5 हजारांत विकलेला मोबाईल लाॅजमालकाकडे

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी बदमाश विशाल याने सुरूवातीला आपण मोबाईल कसारा घाटात फेकल्याची माहिती दिली होती. मात्र तो मोबाईल बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथील एका लाॅज मालकाला पाच हजार रूपयांना विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित लाॅजच्या मालकाशी संंपर्क साधला आहे. मालकाने मोबाईलसह सीमकार्ड पोलिसांना देण्याची तयारी दर्शवली आहे. या मोबाईलमधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. विशालने बालिकेचा हत्या करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर आणखी कुणाशी संपर्क साधला होता का ? याचा उलगडा मोबाईल हाती लागल्यानंतर होणार आहे. तर गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

क्रूरकर्म्याच्या घराला केडीएमसीची नोटीस

ज्या घरात अत्याचार हत्याकांड घडले ते विशाल गवळी राहत असलेले घर धोकादायक असल्याचे पुढे आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने यापूर्वी नोटीस दिली आहे. त्याप्रमाणे त्यांनी काही दुरुस्त्या केल्या आहेत. तथापी त्याची माहिती केडीएमसीकडे आलेली नाही. ही माहिती नोटीस पाठवून पुन्हा मागविण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कागदपत्रांची छाननी करून विशाल गवळीच्या घरासंदर्भात प्रशासन योग्य निर्णय घेईल, असे आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news