Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेसाठी ठाण्यात मनसेची मोर्चेबांधणी...
ठाणे : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरुवात केली असताना दुसरीकडे मनसेनेही आता विधानसभेसाठी ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात येऊन चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे.
विधानसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाण्याला राजकीयदृष्ट्या राज्यातच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी खर्या अर्थाने ठाण्यात मोठ्या प्रमाणात उडणार असून यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापासूनच मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे आता मनसेने देखील गणेशोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यातूनच विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे आज
बैठकीतून कार्यकर्त्यांशी साधणार संवाद...
चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळाना भेटी दिल्यानंतर महत्वाचे पदाधिकारी आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांशीही राज ठाकरे संवाद साधणार आहेत. या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकी विषयी चर्चा केली जाणार असल्याचे समजते. मात्र राज ठाकरे ही बैठक घेणार की नाही याबाबत अद्याप मनसेच्या पदाधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
(11 सप्टेंबर) रोजी ठाण्यातील ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. राज ठाकरे यांच्या येण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे. राज ठाकरे हे संध्याकाळी हा दौरा करणार असून या दौर्याची कार्यकर्त्यांकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे विधानसभेतून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते. अविनाश जाधव यांचा 19 हजार 424 मतांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पराभव केला होता. संजय केळकर यांना 92 हजार 298 मते मिळाली होती तर अविनाश जाधव यांना 72 हजार 874 मते मिळाली होती. आता केवळ ठाणे विधानसभा नव्हे तर ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात मनसेने आपले लक्ष केंद्रित केले असून उत्सवाच्या निमित्ताने एक प्रकारे मनसेने मोर्चेबांधणीलाच सुरुवात केली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.