Vasai Accident Video: 4 वर्षांच्या चिमुकलीचा 12 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा वसईचा व्हिडिओ व्हायरल

Vasai building accident: खिडकीला संरक्षक जाळी नसल्याने अनविका बाराव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला.
Vasai building accident Anvika Prajapati Death Case
Vasai building accident Anvika Prajapati Death CasePudhari
Published on
Updated on

CCTV Video 4-year-old girl falls from 12th floor in Vasai

विपुल पाटील, वसई

वसई: चार वर्षांची अनविका... मंगळवारी दुपारी घराबाहेर पडली... आई तिला घेऊन बाहेर जाणार होती.. तेवढ्याच वेळेत अनविका मजल्यावरील मोकळ्या जागेत खेळत होती... शेवटी तिच्या आईने चपलेच्या लाकडी रॅकवर बसवले... आईचं लक्ष नसताना अनविका खिडकीत बसायला गेली आणि शेवटी जे नको होतं तेच घडलं... खिडकीला संरक्षक जाळी नसल्याने अनविका बाराव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना घडलीये मुंबईजवळील वसईमध्ये. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vasai building accident Anvika Prajapati Death Case
Kalyan Lehenga Video: वधुचा लेहंगा न आवडल्याने तरूणाने दुकानातच चाकूने फाडला; दुकानदारालाही धमकावलं, पाहा व्हिडिओ

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (22July 2025) दुपारच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, अनविका तिच्या आईसोबत घराबाहेर पडते. आई दार लावत असताना अनविता मोठ्या चपला घालून चालत जाते. काही सेकंदात ती चप्पल काढून समोरील घराच्या दिशेने जाते. अनविकाने मस्ती करू नये, यासाठी तिची आई अनविताला घराबाहेरील चपलेच्या लाकडी स्टँडवर बसवते. पण अनविका तिथेही शांत बसत नाही. तिथून अनविता खिडकीत बसते आणि अवघ्या काही क्षणात ती खाली पडते. खिडकीला संरक्षक जाळी नसल्याने ती खाली पडली. आईला हे लक्षात येताच ती अक्षरश: किंचाळते, अनविका खाली पडलीये असं सांगत इतरांना घराबाहेर बोलावते. अवघ्या 27 सेकंदामध्ये प्रजापती कुटुंबावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काळजा ठोका चुकला

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ बघणाऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला. या घटनेनं इमारतीत शोककळा पसरली आहे. नायगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर प्रजापती कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.   

Vasai building accident Anvika Prajapati Death Case
Palghar Bogus Doctor | गोवाडे येथील बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; मासवण आरोग्य केंद्राच्या कारवाईनंतर पोलिसांत गुन्हा दाखल

संरक्षक जाळी लावा

या दुर्दैवी घटनेमुळे उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली आहे. अनेक सोसायट्यांमध्ये मोकळ्या जागेतील खिडक्यांना ग्रिल किंवा सेफ्टी नेट बसवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. या घटनेनंतर पालकांनी आणि सोसायटी व्यवस्थापनाने लक्ष देण्याचे आवाहन केले जात आहे. गॅलरीच्या किंवा घराबाहेरील पॅसेजमध्ये रेलिंगजवळ स्टूल, खुर्ची किंवा इतर कोणतेही फर्निचर ठेवू नये, असंही आवाहन केलं जातंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news