Bhayandar illegal liquor seizure: राज्य उत्पादन शुल्कची हातभट्टी विरोधात मोहीम; १० लाखांचा दारूचा मुद्देमाल जप्त

उत्तन रोडवरील मुर्धा खाडीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी; १,४०० लिटर दारू आणि बोट हस्तगत, दोन गुन्हे दाखल
Bhayandar illegal liquor seizure
Bhayandar illegal liquor seizurePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: राज्य उत्पादन शुलक विभागाच्या कोकण विभागाच्या पथकाने हातभट्टी विरोधात राबविलेल्या मोहिमेत मुर्धा खाडी, मिठागराच्या उत्तरेस, उत्तन रोड भायंदर पश्चिम येथे केलेल्या छापेमारीत तब्बल १० लाख १ हजार ८६० रुपयांचा हातभट्टी दारूचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये हातभट्टीची दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा सहभाग आहे.

राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग यांनी राबविलेल्या हातभट्टी दारूच्या विरोधातील कारवाईत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, आणि कोकण विभाग उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार २० नोव्हेंबर, २०२६ पासून सुरु केलेल्या कारवाईत भरारी पथकाने मुर्धा खाडी, मिठागराच्या उत्तरेस, उत्तन रोड भायंदर पश्चिम येथे केलेल्या कारवाईत हातभट्टी निर्मिती साठी लागणारे साहित्य व हातभ‌ट्टी वाहतुकीसाठी वापरली जाणाऱ्या बोटीसह लाखो रुपयांचा मु‌द्देमाल मिळाला असता तो जागीच नाश करण्यात आला असून मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत २ गुन्हे नोंद करण्यात आले असून या छापेमारीत पथकाने १४०० लिटर हातभट्टीची तयार दारू, १९ हजाराचे रसायन, एक प्लास्टिक बोट, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले.

Bhayandar illegal liquor seizure
Pali Dam Water Leakage: पिंजाळ नदीवरील पाली बंधाऱ्याला भगदाड; दररोज हजारो लिटर पाणी वाया

सदरची कार्यवाही निरीक्षक जे. एम. खिल्लारे यांनी केली असून कार्यवाहीत सर्वश्री दुय्यम निरीक्षक दीपक खडसे, रत्नाकर शिंदे, स.दु.नि अर्जुन कापडे सर्वश्री जवान भरत एडके, अमजद तडबी व शुभम माळी यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सखोल तपास निरीक्षक जे. एम. खिल्लारे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.