Thane News | भिवंडीत पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्याकरिता

अहो आश्चर्यम! भिवंडीत सर्व्हिस सेंटरवर पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्याकरिता
Thane Bhiwandi
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा वापर सर्व्हिस सेंटरमध्ये वाहने धुण्यासाठी करण्यात येत आहे.pudhari news network
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation) कार्यक्षेत्रातील अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच पाणीपुरवठा वितरण प्रक्रीया विस्कळीत होउन नागरीकांना कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचा तक्रारी वाढत आहेत. त्याची दखल घेत पाणीपुरवठा विभागातील पथकाने चार ठिकाणी कारवाई केली.

Summary

नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा वापर सर्व्हिस सेंटरमध्ये वाहने धुण्यासाठी करण्यात आल्याचे आढळून आल्याने अशा चार ठिकाणी पाणी चोरांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation)

शहरात तब्बल चार ठिकाणी कारवाई (Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation)

पहिल्या कारवाईत शहरातील मौजे नागांव-गायत्रीनगर येथील ताजीया चौक अमीर हमजा मस्जीद येथे मिन्दु फारुक शाह यांनी मनपाची कोणतीही रितसर परवानगी न घेता मनपाच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून अर्धा इंच व्यासाची दोन नळ कनेक्शन अनधिकृतपणे घेतले असल्याने त्याच्यावर सोमवार (दि.१५) रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

दुसर्‍या कारवाईत नाशिक रोड ममता हॉस्पिटल, शानदार मार्केटला लागून अब्दुल हाफिज यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून सर्विस सेंटरकरीता अर्धा इंच व्यासाची एक नळ जोडणी घेवून पिण्याच्या पाण्याचा व्यवसायीक वापराकरिता पाणी वापर केल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी असलेले प्रेशर पंम्प व पाईप जप्त करण्यात आले.

तिसर्‍या कारवाईत मौजे- नागांव मनपा शौचालयाच्या बाजुला आवचित पाडा येथे मंजुर अन्सारी यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता महानगरपालिकेच्या एस.टी.पी प्लांट मधून सर्विस सेंटर करीता व्यवसायीक वापराकरिता अर्धा इंच व्यासाची एक नळ जोडणी घेवून पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केला. सदर ठिकाणी प्रेशर पंम्प व पाईप जप्त करण्यात आले.

चौथ्या कारवाईत मौजे नागांव, खंडुपाडा नाल्याचे बाजुला कफील इद्रीस यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून सर्विस सेंटरमध्ये व्यवसायीक वापराकरिता अर्धा इंच व्यासाची एक नळ जोडणी घेवून पाणी वापर केला. सदर ठिकाणी असलेले प्रेशर पंम्प व पाईप जप्त करण्यात आले. या सर्व कारवाईनंतर संबधितांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news