Ulhasnagar Politics : उल्हासनगरात शिवसेनेला धक्का; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विकीसिंह लबाना यांचे नगरसेवक पद रद्द

Ulhasnagar Politics : उल्हासनगरात शिवसेनेला धक्का; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विकीसिंह लबाना यांचे नगरसेवक पद रद्द
Published on
Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक विकीसिंह दर्शनसिंग लबाना यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध घोषित केल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी हा आदेश जारी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून विकीसिंह लबाना निवडून आले होते. त्यांनी निवडणुकीवेळी सादर केलेल्या बंजारा जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली असता ते अवैध असल्याचे समितीच्या तपासात निष्पन्न झाले.

त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १० (१-क) अंतर्गत महापालिका आयुक्तांनी लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश २३ मे २०२६ पासून लागू करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news