Ulhasnagar Murder | दगडाने ठेचून केली सराईत गुंडाची निर्घृण हत्या!

अवघ्या 24 तासात आरोपी गजाआड, आरोपीला 8 दिवसांची पोलिस कोठडी
Ulhasnagar Murder | दगडाने ठेचून केली सराईत गुंडाची निर्घुण हत्या!
Ulhasnagar Murder | दगडाने ठेचून केली सराईत गुंडाची निर्घुण हत्या!
Published on
Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 1 मधील शिवनेरी नगर परिसरात काल सायंकाळी घडलेल्या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शुभम पाटील उर्फ पप्प्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.       

मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास प्रवीण अशोक वर्मा या तरुणाची अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड टाकून ठेचून हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच उल्हासनगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. घटनेची गंभीर दखल घेत परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता.        उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, पोलीस निरीक्षक अंकुश मस्के यांच्या पोलीस पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी शुभम पाटील उर्फ पप्प्या याला ताब्यात घेत अटक केली. शुभम पाटील आणि प्रवीण वर्मा यांच्यामध्ये जुना वाद होता. या वादातूनच या हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news