

उल्हासनगर : यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे 150 कोटींचे टार्गेट समोर ठेवणारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अजिज शेख यांनी करबुडव्यांना थकबाकी एकत्रित भरण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यासाठी चालुवर्षी 22 ते 27 जुलै पर्यंत थकीत मालमता करावर 100 टक्के व्याज माफीची अभय योजना जाहीर केली आहे. त्यात पहिल्याच दिवशी थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद देऊन दोन कोटींच्यावर भरणा केल्याने महानगरपालिकेने लक्ष्याकडे आगेकूच केल्याचे चित्र दिसून येत आहे. (government expenditure - financial management)
उल्हासनगर महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त अझिझ शेख यांच्या आदेशानव्ये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, जमीर लेंगरेकर,कर निर्धारक व संकलक निलम कदम-बोडारे, उपकर निर्धारक व संकलक मनोज गोकलानी तसेच 10 कर निरीक्षक ही टीम सक्रिय झालेली आहे. मालमत्ता कर विभाग (government expenditure - financial management) हा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्तोत्र असून त्यादृष्टीने मागच्या वर्षी आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी दोनदा अभय योजना लागू केली होती. त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने या दोन्ही योजनेत सरासरी 11 कोटींच्यावर वसुली झाली होती. तसेच 31 मार्च 2024 पर्यंत 110 कोटींची विक्रमी वसुलीचा उच्चांक गाठण्यात आला होता. चालू वर्षीच्या पहिल्या अभय योजनेच्या पहिल्याच दिवशी थकबाकीदारांनी 2 कोटी 16 लाख 46 हजार 611 रुपयांचा भरणा केल्याने आणि अद्यापही पाच दिवस शिल्लक असल्याने मागील अभययोजनेची आकडेवारी पार होणार आणि मार्च 2025 पर्यंत मागचे सर्व विक्रम मोडीत काढून 110 कोटीच्या वर वसुली होईल, असा विश्वास कर निर्धारक व संकलक निलम कदम-बोडारे यांनी व्यक्त केला आहे.