Ulhasnagar Fire News | एकाच घरात एकाच दिवशी दोनदा आग : वृद्ध महिलेचा जीव थोडक्यात बचावला!

Fire Incidents
Fire Incidents Pudhari
Published on: 
Updated on: 

पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगर कॅम्प 5 मधील सेक्शन 39 येथे बॅरेक क्रमांक 1855 समोरील एका घराला सोमवारी संध्याकाळी आणि रात्री अशा दोन वेळा आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत घरात उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेची सुखरूप सुटका करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.   

   मिळालेल्या माहितीनुसार, घराला आग लागल्याची माहिती मिळताच समाजसेवक व युवा नेते रोशन वलेछा यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले. जवानांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, आगीच्या वेळी घरात एक वृद्ध महिला उपस्थित होती. तिला वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने तिचा जीव वाचला. मात्र, एकाच दिवशी एकाच घरात दोनदा आग लागल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.   

 स्थानिकांच्या माहितीनुसार, या घरात यापूर्वीही अनेकदा किरकोळ आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वारंवार आग लागण्यामागे विद्युत उपकरणांतील बिघाड, शॉर्टसर्किट किंवा अन्य काही कारण आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. सध्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, तपासणीनंतरच त्याचा उलगडा होऊ शकेल. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, एकाच घरात वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news