Ulhasnagar Crime : पार्सल वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

Ulhasnagar Crime : पार्सल वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला
Published on
Updated on

उल्हासनगर : पार्सल उचलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मनीष पारवानी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मुश्ताक नावाच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला माल न देण्याचे आवाहन उल्हासनगर कॅम्प 5 मधील जीन्स व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

दुपारच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प 5 येथील स्वामी शांतिप्रकाश स्कूल परिसरातील एका जीन्स दुकानातून मुश्ताक नावाचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक पार्सल भरत होता. त्यावेळी कपिल आणि मनीष हे दोघे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तेथे पोहोचले. यानंतर मुश्ताक आणि त्याच्या साथीदारांनी दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मनीष पारवानी यांच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी उल्हासनगर कॅम्प 5 येथील भगवान रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून व्यापारी नेते आकाश वाधवानी आणि दीपक मूलचंदानी यांनी उल्हासनगर कॅम्प 5 मधील व्यापाऱ्यांना मुश्ताकला माल न देण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात कोणत्याही व्यापाऱ्याने माल देण्यास नकार दिल्यास अशाच प्रकारच्या घटना घडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news