Ulhasnagar Crime | उल्हासनगरात 3.3 किलो गांजासह एकाला अटक

विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई |अंमली पदार्थ व रोख रक्कम जप्त
Ulhasnagar Crime | उल्हासनगरात 3.3 किलो गांजासह एकाला अटक
Ulhasnagar Crime | उल्हासनगरात 3.3 किलो गांजासह एकाला अटक
Published on
Updated on

उल्हासनगर :  विठ्ठलवाडी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातून एका व्यक्तीस गांजासह अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 3 किलो 329 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

       पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प 4 मधील आदर्शनगर परिसरात संशयित व्यक्ती गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक बंकटस्वामी दराडे यांना मिळाली. ह्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक बंकटस्वामी दराडे, पोलीस अंमलदार रामदास मिसाळ, सागर मोरे, चंदू गायकवाड, संतोष सांगळे, गणेश राठोड, दिलीप चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत झडती घेतली असता अंदाजे 3 किलो 329 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news