Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

परस्परविरोधी गुन्हे दाखल
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
File Photo
Published on
Updated on

​उल्हासनगर : खेमाणी परिसरात मासे विक्रीच्या कारणावरून आणि जुन्या वादातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी दोन्ही बाजूंनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

​पहिल्या घटनेत फिर्यादी गुरुशिश सिंग जगताल सिंग सबंथा(१८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास ते आपल्या मित्रांसह घराबाहेर असताना आरोपींनी त्यांना घेरले. "तू विजयसोबत का फिरतोस, तुला मासे विक्रीचे दुकान लावू देणार नाही," असे म्हणत आरोपींनी लोखंडी रॉड, कोयता, लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी गुरुशिश यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गुरुशिश यांच्या आईलाही आरोपींनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगलसिंग तारासिंग गिल, ममताकौर मंगलसिंग गिल, जसबीरसिंग मंगलसिंग गिल, रणबीरसिंग मंगलसिंग गिल, अवतारसिंग तारासिंग गिल आणि मनजितकौर तारासिंग गिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर ममताकौर मंगलसिंग गिल(४०) यांनी देखील तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार रात्री दीडच्या सुमारास गुरुशिश सिंग जगताल सिंग याने त्यांच्या घराच्या गॅलरीत दगडफेक केली. या प्रकाराबाबत विचारणा केली असता, त्याने पतीला शिवीगाळ करत "तुमचा गेम करतो" अशी धमकी दिली आणि कमरेला असलेला कोयता काढून पतीच्या पोटावर, खांद्यावर आणि पाठीवर सपासप वार केले. पतीला वाचवण्यासाठी ममताकौर आणि त्यांची सासू राणी दर्शनसिंग गिल(५५) गेल्या असता, त्यांनाही शस्त्राने जखमी करण्यात आले. या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुशिश सिंग जगताल सिंग(१८) आणि राणी दर्शनसिंग गिल(५५) यांच्या विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news