Devendra Fadnavis | ठाकरे सरकारमुळे मेट्रो प्रकल्प अडीच वर्ष रखडला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत ठाण्यात मेट्रोची चाचणी
metro project news
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पाची चाचणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली(Pudhari Photo)
Published on
Updated on

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray

ठाणे : ठाकरे सरकारमुळे मेट्रो प्रकल्प अडीच वर्ष रखडला असा आरोप करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.मेट्रोचा हा टप्पा पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विशेष प्रयन्त केले असून त्यांचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले. ठाकरे सरकारमुळे मेट्रो प्रकल्पाला विलंब झाला नसता तर आम्ही आणखी पुढचा टप्पा गाठू शकलो असतो, मी ठाणेकर आणि मुंबईकर यांना विश्वास देऊ इच्छितो, पुढच्या वर्षी पर्यंत यातील बहुतांश काम आम्ही पूर्ण करून तिसरा टप्पा देखील पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात पार पडली. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,आमदार निरंजन डावखरे, मेट्रोचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पासाठी जवळपास १६ हजार कोटी खर्च करण्यात येत आहेत. दैनंदिन प्रवासी संख्या १३ लाख ४७ हजार अपेक्षित असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यावर ही संख्या अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

मेट्रोसाठी मोघरपाडा येथे डेपो करिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४५ हेक्टर जागा त्याठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो ४ मेट्रो ४ अ मेट्रो १० आणि ११ डेपो म्हणून काम होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. पूर्व उपनगरे पश्चिम उपनगरे मुंबई आणि ठाणे असे जोडणारा मार्ग असणार आहे. मेट्रो ११ वडाळा ते सीएसएमटी पर्यंत जातो, यालाही हा मार्ग जोडला जाणार आहे. हा सगळ्यात लांब ५५ किमीचा मार्ग सून यातून २१ लाख लोक रोज प्रवास करतील. टप्प्या टप्प्याने पुढच्या वर्षी पर्यंत सर्व टप्पे पूर्ण झाले पाहिजे असा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील डेपो साठी विशेष प्रयत्न केले आहे. मी ठाणेकर आणि मुंबईकर यांना विश्वास देऊ इच्छितो पुढच्या वर्षी पर्यंत यातला बहुतांश काम आम्ही पूर्ण करू ,पण काही काम २०२७ पर्यंत जाईल. एकदा हा मार्ग झाला ठाण्यापासून सीएसएमटी पर्यंत मार्गिका ही मुंबई आणि ठाणे करांकरिता उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मी मुख्यमंत्री असताना मेट्रोला चालना मिळाली - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस ठाणेकरांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे.वडाळा ठाणे ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आपण इथपर्यंत पोहचलो आहोत. 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये या सगळ्या प्रकल्पांना ब्रेक लागला,स्थगिती मिळाली मात्र 2022 मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मेट्रोला चालना दिली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला मात्र वगळण्यात आलं होतं त्यावेळेस ठाण्याला मेट्रोच्या प्रकल्पात समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. मुंबई ते ठाणे ही पहिली लोकल धावली होती 22 एप्रिल 1853 मध्ये जवळपास 172 वर्षानंतर मेट्रो धावत आहे असल्याचे शिंदे म्हणाले. ठाण्यासाठी इंटरनल मेट्रो देखील आपण मंजूर केलेली आहे कल्याण डोंबिवली भिवंडी याला कनेक्ट होईल. त्यामुळे हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

२०२७ पर्यंत तीनही टप्पे पूर्ण होणार...

घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन असा चार किलोमीटरच्या प्रवासाची चाचणी सोमवारी घेण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०२५ च्या अखेरीस गायमुख ते कॅडबरी जंक्शन असे दहा मेट्रोचे स्थानक खुले करण्यात येणार आहे. आणि २०२७ पर्यंत कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर आणि गांधीनगर ते वडाळा पर्यंत ३२ मेट्रो स्थानक प्रवासासाठी खुले करण्याचा प्रयत्न असणार आहे. यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.

मेट्रोवरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवाद...

मेट्रोच्या गायमुख स्थानकात ट्रायल रन वेळी भाजप आणि शिवसेनेत श्रेय वादाची लढाई समोर आली. 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रोची प्रतिकृती दिलेली फ्रेम लावण्यात येणार असल्याचे सांगत भाजपला डीवचन्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. तर मी मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थाने मेट्रोला चालना मिळाली असल्याचे उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान करून हे हे श्रेय आपले असल्याचे यावेळी सूचित केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . तर शिवसेनेने रस्त्यावर पोस्टर्स लावून श्रेय घेण्याचा केला प्रयत्न केल्याचे दिसून आले.

मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये..

- बी ई एम एल चे ६-डब्यांचे ट्रेन-सेट्स, जे मेट्रो मार्ग २अ व ७ वर चालत आहेत त्याच पध्दतीच्या , पुढील सुविधा असतीलः

- आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम

- प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा

- स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली

- अडथळा शोध उपकरण

-आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा

-ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली

-ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे ३०% बचत)

ठाणे मेट्रो मार्गिका 4-अ वरील स्थानक*

1) गायमुख

2) गोवनीपाडा

3) कासारवडवली

4) विजय गार्डन

5) डोंगरी पाडा

6) टिकुजी नी वाडी

7) मानपाडा

8) कापूरबावडी

9) माजिवडा

10) कॅडबरी जंक्शन......

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news