राज ठाकरेंना शिवसेना सोडायला लावणारे उबाठा आधुनिक काळातील दुर्योधनच

MP Naresh Mhaske | शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका
MP Naresh Mhaske
खासदार नरेश म्हस्केFile Photo
Published on
Updated on

ठाणे : भावडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन असून त्यांनी इतर भावंडांना कायम सापत्न वागणूक दिली. उद्धव ठाकरेंमुळेच राज यांना शिवसेना सोडावी लागली, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज केली. तसेच राज यांच्या घराला कॅफेटेरिया म्हणणे हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय संजय राऊत बोलू शकतात का? असा प्रश्न त्यांनी केला.

ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार म्हस्के यांनी उबाठावर हल्लाबोल केला. उबाठामध्ये गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज ठाकरेंची गरज भासतेय, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.

खासदार म्हस्के म्हणाले की, ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधनाने सुईच्या टोका इतकी देखील जागा भावंडांना देणार नाही, अशी भूमिका घेतली होती, त्याचप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज यांना शिवसेनेतून खड्यासारखे बाजुला केले होते, उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन आहेत, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी उबाठा खासदार अरविंद खान यांनी लोकसभेत आणि संजय मुल्ला यांनी राज्यसभेत विरोध केला. वक्फ बोर्डाच्या जमिनींचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होतो. यासंदर्भात आलेल्या सुधारणा विधेयकाला तुम्ही विरोध करता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुल्ला मौलवींकरवी मतदानाचे आवाहन करायला लावता, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला तुम्हाल लाज वाटते, हे तुमचे हिंदुत्व आहे का, अशा जळजळीत शब्दांत खासदार म्हस्के यांनी उबाठाला जाब विचारला.

खासदार म्हस्के पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तरोत्तर होणारी प्रगती आणि जनमाणसांतील प्रतिमा उजळल्याने उबाठा आणि संजय राऊत यांच्या शरिराची लाही लाही झाली आहे. असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. राज ठाकरे यांच्या घराला कॅफेटेरिया म्हणणे, हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय राऊत बोलू शकतात का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला.

खासदार म्हस्के म्हणाले की, उबाठाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती मात्र कामाचे निमित्त सांगून उबाठा, आदित्य ठाकरे फडणवीस यांना भेटतात, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पक्षाला भेसळ म्हटले आहे. खरच भेसळ आहात की असली ते खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट करावे, असे आवाहन खासदार म्हस्के यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news