Swine Flu Cases: कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात खाजगी रुग्णालयात सापडले स्वाइन फ्लूचे रुग्ण

माहिती उशिरा कळविल्याने आरोग्य विभाग खाजगी रुग्णालयास बजावणार नोटीस
Swine Flu
Swine FluPudhari
Published on
Updated on

कल्याण: पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजाराचा फैलाव होऊ लागला आहे. गत दोन महिन्यात तापाचे जवळ पास साडेचार हजार रुग्ण सापडले तर डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर, कावीळ, हगवान, अतिसारचे रुग्ण सापडू लागल्याने पालिका आरोग्य विभाग अलर्ट मोड वर आली आहे.

खाजगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण सापडले असून खाजगी रुग्णालयाने याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला उशिरा कळविल्याने पालिका आरोग्य विभाग खाजगी रुग्णालयास नोटिस बजावणार आहे.

महाालिका हद्दीत दोन स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले. त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यापैकी एकाला सोमवारी तर अन्य एकाला मंगळवारी उपचार करुन घरी सोडून देण्यात आले आहे.

महापाालिका हद्दीत साथरोगासह संसर्ग जन्य आजाराची लागण झालेला रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास त्याची माहिती त्यांनी नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रासह महापालिकेच्या आरोग्य विभागास कळविणे बंधनकारक आहे.

Swine Flu
Medical Waste: मोहने परिसरात मुदतबाह्य औषधांचा ढीग; उल्हास नदीकाठी मेडिकल वेस्टमुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर

जेणे करुन ज्या परिसरात संसर्ग जन्य आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. त्या परिसरातील पाण्याचे नमुने घेणे, तसेच सर्वेक्षण करणे सोपे जाते.

अन्य रुग्णांना त्याची लागण होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करता येते. स्वाईन फ्लूची लागण झालेल्या या दोन रुग्णांची माहिती खाजगी रुग्णालयाने महापालिकेच्या नागरी केंद्र आणि आरोग्य विभागास दिली नाही.

त्यामुळे जी खाजगी रुग्णालये अशा प्रकारची माहिती लपवून ठेवतील त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून उगारला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागाचे वैद्यकीय अधिकारी संदीप मुकणे यांनी दिली आहे.

Swine Flu
Hospital Negligence: अडीच वर्षाचा मुलाला इंजेक्शन देताना सुई कमरेतच राहिली; एक्स-रेनंतर खुलासा

१ जून ते ३० जुलै या कालावधीत डेंग्यू-१२, मलेरिया- २८, विषमज्वर-५४, काविळ- ३६, हगवण-६९, अतिसार-१०, ताप- ४५५४ रुग्ण आढळून आले असल्याने पालिका या साथीच्या आजार रोखण्यासाठी अलर्ट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news