

सापाड : कल्याणमध्ये एमडी ड्रग्ज सापडल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या डीसीपी स्कॉडने 22 लाखाचे एमडी ड्रग्ज जप्त करीत. या प्रकरणात मोहम्मद कैफ शेख आणि फरदीन शेख या दोन तरुणांना अटक केली आहे. यांनी हे ड्रग्ज कोणाकडून आणले होते. यांचे ग्राहक कोण आहेत याचा तपास बाजारपेठ पोलिस आणि डीसीपी स्कॉड संयुक्तरित्या करणार आहेत.
डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या डीपीसी स्कॉडने आणि पोलिस ठाण्याची टीम यांनी एक अंमली पदार्थ विरोधात मोठी मोहिम सुरु केली आहे. काही दिवसापूर्वी डोंबिवलीत हायप्रोफाईल सोसायटीत दोन वेगवेगळया घटनेत जवळपास चार कोटी 24 लाखाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
या प्रकरणात एका परदेशी नागरीकासह पाच जणांना अटक केली होती. अशाच प्रकारे कल्याण-डोंबिवली गेल्या सात महिन्यापासून डीसीपी झेंडे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली आहे.