Wildlife rescue operation : कृत्रिम श्वासोच्छ्वासाद्वारे वाचविले कासवाचे प्राण

दुर्मीळ कासवावर इन्फ्रारेड थेरपीपासून कृत्रिम श्वासोच्छ्वास अर्थात ऑक्सिजन देऊन त्याचे प्राण वाचविण्यात पॉजला यश
Wildlife rescue operation
कृत्रिम श्वासोच्छ्वासाद्वारे वाचविले कासवाचे प्राणpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : पॉज ही एक अशी संस्था आहे जिने सूक्ष्म जीवांपासून मोठ्या आकाराच्या जनावरांपर्यंत अनेक पक्षी आणि प्राण्यांचे प्राण वाचविले आहेत. यात मृदू पाठीच्या कासवाचाही समावेश आहे. दुर्मीळ कासवावर इन्फ्रारेड थेरपीपासून कृत्रिम श्वासोच्छ्वास अर्थात ऑक्सिजन देऊन त्याचे प्राण वाचविण्यात पॉजला यश आले आहे.

एक कासव कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी कारागृहाजवळ जखमी अवस्थेत पडलेले आहे, असा पॉजच्या हेल्पलाईनला कॉल आला होता. त्याला वाचवण्यासाठी पॉजचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या कासवावर उपचारासाठी क्लिनिकमध्ये आणले. तेथे त्याच्या पाठीवर उपचार करण्यात आले. त्याला इन्फ्रारेड थेरपी देण्यात आली. नेब्युलाझर लावण्यात आले, तसेच कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजन देण्यात आले.

अंतर्गत रक्तस्राव थांबण्यासाठी औषधाचे इंजेक्शनही देण्यात आले. दरम्यान वेळीच उपचार मिळाल्याने कासवाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे हे कासव कल्याण येथील वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले. ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी रजिस्टर्ड संस्था असून गेल्या 25 वर्षांपासून अविरतपणे वन्यजीवांचे पुनर्वसन करत आहे. दरवर्षी शेकडो सरपटणारे वन्यजीव, प्राणी आणि पक्षी निसर्गात मुक्त केले आहेत.

सॉफ्टशेल गोड्या पाण्यातील प्रकार

जीवदान दिलेल्या कासवाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी माहिती दिली. भारतीय सॉफ्टशेल कासव म्हणजे मराठीमध्ये भारतीय मृदू कवचाचे कासव किंवा गंगा सॉफ्टशेल कासव, हे गोड्या पाण्यातील कासवाचे प्रकार आहे, जे प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंडमध्ये आढळते.

हे कासव गंगा, सिंधू आणि महानदी यांसारख्या नद्यांमध्ये आढळते. त्याची लांबी 60 सेंमीपर्यंत वाढू शकते. वजन 50 किलोपर्यंत असू शकते. त्याचे कवच मऊ आणि चपटे असते, जे त्वचेने झाकलेले असते. मासे, उभयचर, कॅरियन आणि जलचर वनस्पती हा त्यांचा आहार आहे. हे कासव असुरक्षित म्हणून सूचीबद्ध असल्याचे डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news