

मिरा रोड : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत अडीच वर्षाचा मुलगा डाळिंबाचे दाणे खात होता. ते दाणे त्याच्या श्वास नलिकेत अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.
भाईंदर पूर्वीच्या काशी नगर येथील देवदर्शन अपार्टमेंट मध्ये राहणार्या महेश पिरदानकर यांचा अडीच वर्षाचा मुलगा 4 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता डाळिंबाचे दाणे खात होता. दाणे खात असताना श्वास नलिकेत डाळिंबाचे दाणे अडकले. त्यामुळे त्या मुलाला त्रास होऊ लागल्याने तो बेशुद्ध झाला होता. त्याला तात्काळ भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले असता तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्यानंतर त्या बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अकस्मात मृत्यूच्या नोंदीचा तपास पोलीस हवालदार असिफ मुल्ला हे करत आहेत.