

अंबाडी : मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (दि.30) सकाळी दिवे अंजुर गावाच्या हद्दीत एका वेरणा चारचाकी वाहनाला अचानक आग लागली.
नाशिकच्या दिशेने जाणारे वाहन दरम्यान दिवे अंजूर भागात आली असता, अचानक वाहनाच्या पुढील भागाला आग लागली. अचानक धूर निघायला लागल्यावर वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवत वाहन थांबवले आणि इतर सहप्रवासी बरोबर बाहेर पडल्याबरोबरच वाहनाने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे वाहनाचा पुढील भाग जळून खाक झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.