डोंबिवली : विद्यार्थ्याने जीवन संपवल्याचे प्रकरण संचालकाला भोवले

पोलिसांनी ठोकल्या शाळेच्या संचालकाला बेड्या
School director arrested in connection with student's death
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शाळेच्या संचालकाला अटकPudhari Photo
Published on
Updated on

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : निंबवली येथे जीवन संपवल्याची घटना बुधवारी (दि.10) घडली होती. अनिश दळवी या 16 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेवून जीवन संपविले. या घटनेस कारणीभूत ठरलेल्या शाळेच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंदवून तालुका पोलिसांनी त्याला अटक केली. ऑलविन अँथोनी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कल्याण कोर्टाने अधिक चौकशीसाठी चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अनिशच्या मृत्यूच्या घटनेच्या नोंदीनंतर तालुका पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्राथमिक चौकशी सुरू केली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान अनिश याला तो शिकत असलेल्या शाळेच्या संचालकांनी जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक ऑलविन अँथोनी याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. ऑलविन अँथोनी याला शुक्रवारी (दि.12) कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने अधिक चौकशीसाठी त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

School director arrested in connection with student's death
कल्याण : शाळेतून काढून टाकण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने संपविले जीवन

अनिशला शाळेकडून धमकी

समाज माध्यमांवर अनिशने त्याच्या मित्रांसोबत एका विद्यार्थिनीच्या संदर्भात पोस्ट केली होती. सेक्रेड हार्ट शाळेच्या प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनिशला बोलावून बेदम मारहाण करण्यात आली. शिवाय लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल, अशी ताकीद देऊन त्या विद्यार्थ्यांना घरी पाठवले. आता आपल्याला शाळेतून काढून टाकणार असल्याचा धसका घेतलेल्या अनिशने टोकाचे पाऊल उचलले. अनिशने मानसिक तणावातून गळफास घेऊन जीवन संपवले. शाळेच्या प्रशासनाने त्याला या घटनेसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप पालकांनी केल्यानंतर तालुका पोलिसांनी चौकशी करून शाळेचा संचालक ऑलविन अँथोनीवर गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news