

नेवाळी (ठाणे) : अनधिकृत बांधकामांचा म्होरक्या ठाण्यात राहतो असा गंभीर आरोप मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला आहे. कारण ही जी चैन आहे. पालिका अधिकारी, रजिस्ट्रेशन ऑफिसचे, बांधकामाचे अधिकारी यात समील आहेत. सर्च रिपोर्ट असल्याशिवाय हे करु शकत नाही. आर्थिक हित संबंध जोपताना त्यांना अभय देण्याचे काम येथील लोकल कोणी करु शकत नाहीत. ते ठाणेवाले करताच असा माझा स्पष्ट आरोप आहे असे मनसेने नेते राजू पाटील यांनी सांगितले. शिंदे पिता पुत्रांचे नाव न घेता मनसे नेते पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे..
पाटील यांनी सांगितले की, एखाद्या सिलेब्रेटीवर काही प्रसंग आला तर त्याला भेटायला जायलाच पाहिजे. कल्याण डोंबिवलीतील लोक मरताहेत. दिव्याला काही लोक रा’केल घेऊन बसले आहेत. पालकमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी इथे येऊन लोकांना भेटायला पाहिजे. गंगेत डुबकी मारुन पाप घुतले जाते. इथे पुण्य जास्त मिळेल. इथे पालकमंत्री आहेत. नगरविकास खाते त्यांचे आहे. मुलगा त्यांचा खासदार आहे.
दीपेश म्हात्रे सहा महिन्यापूर्वी उबाठा गटात आले. चांगले काम करीत आहे. मला पण त्यांचा फोन होता. माझी त्यांना विनंती आहे. ते पुन्हा घरवापसी करणार नसतील तर त्यांच्या मागे मी उभा राहणार. पाेलिस या प्रकरणात सामील आहे. त्यांच्यावर दबाब आहे. वाॅर्ड अधिकारी मोठा जबाबदार आहे. ही मोठी चैन आहे. रहिवासियांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे सगळेच बोलतात. या बाबतीत देखील तसाच प्रश्न आहे. यांना दिलासा देणार कसा. आर्थिक मदत आणि लिगल गोपीनीय घेण्यासाठी मदत करु. परंतू सरकार आमचे नाही. काही हजार लोक आहेत. लाखो लोकांचा या आरक्षित जमीनवर हक्क आहे. त्यांचाही हक्क मारला जातो. सगळे लोक शिंंदे गटात नव्हते. त्यांना धमक्या देऊन पक्षात घेतले. विधानसभा निवडणूकीत त्यांना असे वापरले. हीच सवय लावणार. तुमच्या इमारती तोडणार. तुमच्या रहिवासीयांना पैसे वाटून आम्हाला मतदान करायला सांगा. मतदान झाले नाही तर इमारती तोडण्याची धमकी दिली. चारही आमदारंचे मला माहिती नाही. आमच्या आमदारांच्या ऑफिस समोरची इमारत दोनदा तोडली. ती त्यांच्या ऑफिस समोर उभी राहिली. हे बोलणार नाही. ते हस्तक आहे. दिसायला फक्त आमदार आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याने ते लोकांसमोर आले नाहीत. आले तरी ते लोकांसमाेर भूमिका काय मांडणार. 65 इमारतीपैकी एका इमारतीमध्ये नुकतेच रजिस्ट्रेशन झाले. ही धक्कादायक बाब आहे. रहिवायींना ठाणे मुंबईत बोलावून घेता. त्यांच्याकडे येत नाही. ते येतील कुठल्या तोंडाने. नगरविकास खाते यांचे आहे. मुख्यमंत्री असताना एकही बेकायदा बांधकाम होऊ देणार नाही असे बोलले होते. दिव्यात त्यांचेच नगरसेवक बेकायदा बांधकामात पार्टनर आहे असे पाटील यांनी सांगितले. दिव्यातील बेकायदा इमारतीत ठाणे महापालिकेचा एक जोशी नावाचा अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे पाच नगरसेवक लाटणार आहेत. बेकायदा इमारतीच्या एका स्लॅब मागे तीन लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दिव्यातील बेकायदा इमारतीत ठाणे महापालिकेचा एक जोशी नावाचा अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे पाच नगरसेवक लाटणार आहेत. बेकायदा इमारतीच्या एका स्लॅब मागे तीन लाख रुपये घेतले जातात असा गंभीर आरोप मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.