Bangladesh-India Medical Support | ठाणे मनोरुग्णालयाचे मानले बांगलादेशने आभार

Success Story : मानसिक संतुलन बिघडलेला तरूण झाला बरा, बांग्लादेशात स्वगृही
ठाणे मनोरुग्णालय
बांगलादेशी तरुण फैजलसोबत मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. आशीष पाठक, मनो रोगतज्ज्ञ परिचारिका स्मिता राणे, समाजसेवा अधीक्षक श्रीषा कुळकर्णी, डॉ. पायल सुरपाम, डॉ. प्रियतम दंडवते आदींनी अथक प्रयत्न केले. pudhari news network
Published on
Updated on

ठाणे : अमली पदार्थाच्या अधीन होऊन मानसिक संतुलन बिघडलेल्या एका बांगलादेशी तरुणाने विमानात महिला कर्मचार्‍यांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक करून मानसिक आजारावर इलाज करण्यासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आणलेल्या या तरुणावर एक वर्ष औषधोपचार, समुपदेशन ग्रुप थेरपी आणि सकारात्मक उपचार झाल्यावर नुकतेच पोलिसांच्या मदतीने बांगलादेशात पाठवले आहे, त्यामुळे बांगलादेशच्या स्थानिक प्रशासनाने ठाणे मनोरुग्णालयाचे आभार मानले आहेत.

Summary

बांग्लादेशातील राजदूत फैजल याचा शोध घेत असता, मनोरुग्णालयाशी चार महिन्यापूर्वी संपर्क साधला. यावेळी फैजलमधील सुधारणा बघून पोलिसांच्या मदतीने त्याला नुकतेच बांगलादेशात पाठवले आहे.

बांगलादेशात राहणारा फैजल शेख (नाव बदलून) या युवकाला नशापानाची सवय जडली होती. सप्टेंबर 2023 मध्ये मस्कत मुंबई बांगलादेश या विमान प्रवासात नशेच्या धुंदीत विमानातील महिला कर्मचार्‍यांशी अश्लील भाषेत संभाषण केले होते. विमान कंपनीने याची गंभीर दखल घेऊन त्याच्या विरोधात सहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नशाधीन अवस्थेत असणारा फैजल पोलिसांना व्यवस्थित उत्तर देत नव्हता. त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, लगेचच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाशी संपर्क करून फजल याला उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर फैजलवर उपचार सुरू होते, अशी माहिती रुग्णालय समाजसेवा अधीक्षक श्रीषा कुळकर्णी यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षापासून फैजल अमली पदार्थाचे सेवन करत होता. एखाद दिवशी नशा करायला मिळाली नाही की तो बेचैन होऊन वाटेल तसे वागत होता. त्यामुळे काहीसे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या फैजल याच्यावर उपचार करणे रुग्णालयासाठी मोठे आव्हान होते. बांगलादेशी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणारा फैजल काहीसा वात्रट वागात होता. यावेळी त्याच्यावर औषध, समुपदेशन व ग्रुप थेरपी, व्यवसाय उपचार वर्षभर सुरू होते.

मनोरोग तज्ज्ञ परिचारिका, समाजसेवा अधीक्षक आणि व्यवसाय उपचार तज्ज्ञ रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी परिश्रम करतात. रुग्ण चांगले होऊन घरी जाताना मानसिक समाधान मिळत असते.

डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news