

ठाणे : कौटुंबिक परिस्थिती बेताची त्यामध्ये मानसिक आरोग्य ढासळलेली उत्तर प्रदेशातील एक तरुणी नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडून बेपत्ता झाली. मुंबईत ही तरुणी पोलिसांना फिरताना आढळून आली असता, पोलिसांनी मानसिक आजारावर इलाज करण्यासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केली. तरुणीवर औषधोपचार, समुपदेशन, ग्रुप थेरपी आणि सकारात्मक उपचार झाल्यावर नुकतेच पोलिसांच्या मदतीने तिच्या कुटुंबाकडे सुपूर्त केलं आहे.
उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यात राहणारी ज्योती शर्मा (नाव बदलून) ही तेवीस वर्षीय युवतीची कौटुंबिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने ती नोकरीच्या शोधात असायची. ज्योतीचे मानसिक स्वास्थ्य देखील काहीसे बिघडले होते. नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांत घरात कोणालाच काही न सांगता घर सोडून दिल्ली, प्रयागराज आदी शहरात गेली होती. मात्र तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबाची चांगलीच दमछाक होत असे. सप्टेंबर 2024 मध्ये ज्योती घरातून पळून नोकरी मिळवण्यासाठी मुंबईत दाखल झाली. एकूणच तिचे मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्याने रस्त्यावर फिरताना दिसल्यावर माटुंगा पोलिसांनी ज्योतीला ताब्यात घेऊन, पुढे उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतीवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली. ज्योतीला चांगले करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कुसुममाला एन., डॉ. विजया खांडेपारकर,मनोरुगण तज्ञ परिचारिका मानसी ओझाळे-आदींनी अथक परिश्रम घेतले.
ज्योती सारख्या मानसिक आरोग्य बिघडलेल्या रुग्णांवर कायमच लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वेळच्या वेळी औषध देणे गरजेचे आहे. मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका, समाजसेवक अधीक्षक आणि व्यवसाय उपचार तज्ज्ञ रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी परिश्रम करतात. मनोरुग्ण चांगला होऊन घरी जाताना मानसिक समाधान मिळत असत.
डॉ. नेताजी मुळीक (वैद्यकीय अधीक्षक)
पहिले काही दिवस ज्योती कुठून आली आहे याचा उलगडा होतच नव्हता. तिने सांगितलेल्या काही मोबाईल क्रमांकावर देखील तिच्या कुटुंबाचा शोध घेत समुपदेशन, ग्रुप थेरपी आणि सकारात्मक उपचार देण्याचे काम सुरू होते.