Thane Water Shortage: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 12 दिवस कपातीचे; कोणत्या तारखेला कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद?

Thane Water Cut 12 days Detail Information: दुरुस्तीच्या कामामुळे टप्प्याटप्प्याने विविध ठिकाणी पाणी कपात
Water Scarcity
Water Cut(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Thane Water Cut 12 days Detail Information

ठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेमार्फत भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविणेकरिता बसविण्यात आलेले न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी नदीच्या पाण्याची पातळी कमी केली असून या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाणी पातळी खालावली आहे.

परिणामी, ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा 20 टक्के कमी झाल्याने शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून पुढील 12 दिवसांसाठी पाणी कपात करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विविध ठिकाणी कशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने पाणी कपात करता येईल याचे नियोजन केले आहे.

Water Scarcity
KDMC Water Shutdown : कल्याण-डोंबिवलीत आठ तासांचा शटडाऊन

बुधवार, 28 जानेवारी रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एम.एम.आर.डी.ए. तुळसीधाम, वागळे एमआयडीसी , चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिमनगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, म. फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा स. 9 ते 29 जानेवारी रोजी स. 9 पर्यंत 24 तास बंद राहील.

29 जानेवारी रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आजाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पीटल परिसर, आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 9 वाजल्यापासून 30 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

शुक्रवार 30 जानेवारी रोजी शास्त्रीनगर नं 1 व 2, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, पाँड पाडा, रघुकुल, पारसिकनगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 9 वाजल्यापासून ते 31 जानेवारी रोजी सकाळी 9 पर्यंत 24 तास बंद राहील. 31 जानेवारी रोजी लोकमान्य नगर पाडा नं 3 व 4, इंदिरानगर, सावरकररनगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुनागाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडातील पाणी पुरवठा स. 9 वा. ते 1 फेब्रुवारी स. 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

Water Scarcity
Child Rights Commission : राज्य बालहक्क संरक्षण आयोग अजूनही अध्यक्षांविनाच

1 फेब्रुवारी रोजी लोकमान्य नगर पाडा नं 1, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं 2, शास्त्रीनगर नं 2, अरुण क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळनगर, आझादनगर, मसन वाडा, ऋतू पार्क परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथ नगर, डिसोजा वाडी परिसरात स. 9 पासून 2 जानेवारी रोजी स. 9 पर्यंत बंद राहील. 2 फेब्रुवारी रोजी बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरू, ब्रम्हांड, ऋतू सिटी, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकर आळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकर नगर, क्रांती नगर, परिसरातील पाणी पुरवठा स. 9 पासून 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील.

3 फेब्रुवारी रोजी माजीवाडा, मानपाडा, कोठारी कंपाऊड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुनवाल, डोंगरीपाडा, विजयीनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवलीतील पाणी पुरवठा स. 9 वा. पासून 4 फेब्रुवारी स. 9 पर्यंत 24 तास बंद राहणार आहे. 4 फेब्रुवारी रोजी गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, एमएमआरडीए तुळसीधाम, वागळे एमआयडीसी, चिराग नगर, वर्तकनगर परिसर, समतानगर, वर्तकनगर, भिमनगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, म. फुले नगर, गंगाधर नगर, वैतीवाडी परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 9 पासून 5 फेब्रुवारी रोजी स. 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

5 फेब्रुवारी रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळनगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 9 पासून 6 फेब्रुवारी रोजी स.9 पर्यंत 24 तास बंद राहील. 6 फेब्रुवारी रोजी शास्त्रीनगर नं 1 व 2, लक्ष्मीपार्क, विहंग पार्क, सुरकरपाडा परिसर, सिद्धाचंल, कळवा, मनिषा नगर, खारेगाव, आतकोनेश्वर नगर, भास्करनगर परिसरातील पाणी पुरवठा स. 9 ते 7 फेब्रुवारी रोजी स.9 पर्यंत बंद राहील. 7 फेब्रुवारी रोजी लोकमान्य नगर पाडा नं 1, दोस्ती, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं 2, शास्त्रीनगर नं 2, अरुण क्रीडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, गोकुळ नगर, आझाद नगर परिसरातील पाणी पुरवठा सकाळी 9 ते 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9पर्यंत 24 तास बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news