

Young man dies in Thane rain
ठाणे : मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसाने ठाण्यात तरुणाचा बळी घेतला आहे. रिक्षावर गुलमोहरा चे मोठे झाड पडून एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाला असून रिक्षाचालक यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. ठाण्यातील रुणवाल नगर परिसरात संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गुलमोहराचे विशाल वृक्ष रिक्षावार पडल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी दोन्ही झाडाखाली दबले गेले, घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरु केले. दोन्ही जखमीना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र प्रवासी मयत झाल्याचे रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आले.
रुणवाल नगर, फ्लॉवर व्हॅली, या ठिकाणी संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. प्रवासी आणि रिक्षाचालक दोन्ही राबोडी परिसरातच राहणारे आहेत. तौफिक सौदागर ( 27) असे मयत प्रवशाचे नाव असून त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर . शफीक शब्बीर (55) असे रिक्षाचालकाचे नाव असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचाराकरिता नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने वृक्ष बाजूला हटवून दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील प्रवासी तौफिक हा यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा या घटनेत मृत्यू झाला.
पावसाळ्यात कोणती दुर्घटना घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिकेने दोन महिने आधी ठाण्यातील धोकादायक झाडांचे सर्व्हेक्षण केले होते असा दावा केला होता. याशिवाय फ़ांद्या छाटण्याची मोहीम देखील घेण्यात आली होती. मात्र दोन दिवसात ठाण्यात जवळपास 22 पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली असून या घटनेने तर पालिकेच्या मोहिमेची पोलखोल केली आहे. या घटनेत तरुणाचा नाहक बळी गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.