ठाणे : उल्हासनगर गोळीबार प्रकरण; आठ महिन्यांनंतर जामीन

आमदार गायकवाडांच्या व्यावसायिक भागीदाराला जामीन
आमदार गणपत गायकवाड
कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांच्या व्यावसायिक भागीदाराला आठ महिन्यांनंतर जामीनpudhari news network
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात शुक्रवार, दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळच्या सुमारास गोळ्या झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड यांच्यासह त्यांचे व्यावसायिक भागीदार दिव्येश उर्फ विकी गणात्रा यांनाही पोलिसांनी अटक केली होती. आठ महिन्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारे विकी गणात्रा यांचा जामीन मंजूर केला.

विकी गणात्रा हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे मोबाईल विक्रीचे दुकान कल्याणमध्ये आहे. गणात्रा हे आमदार गणपत गायकवाड यांचे बांधकाम व्यवसायातील भागीदार आहेत. फेब्रुवारी महिन्यात कल्याण पूर्वचे गणपत आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात द्वारली भागातील एका जमिनीवरून वाद सुरू होता. त्यावेळी हा वाद समझोत्याने मिटविण्यासाठी शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे समर्थक, तसेच शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे समर्थक हिललाईन पोलिस ठाण्यात बैठकीसाठी एकत्र आले होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या बाहेर दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची होऊन आपसांत धक्काबुक्की झाली होती.

आमदार पुत्र अद्याप बेपत्ता

या गंभीर प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचा मुलगा वैभव गायकवाड, संदीप सरवणकर, रणजित यादव, हर्षल केणे, नागेश बेडेकर आणि विकी गणात्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात विकी गणात्रा आणि इतर तीन जणांना अटक करण्यात आली. आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव याचेही नाव गुन्ह्यात दाखल आहे. मात्र अद्याप तो हाती लागलेला नाही.

गुन्ह्यात सहभाग नसल्याचा पुरावा ग्राह्य

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत विकी गणात्रा यांचे जामीन मिळण्यासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू होते. कल्याण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गोळीबारात गणात्रा यांचा कोणताही सहभाग नव्हता. गोळीबार होण्यापूर्वी गणात्रा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनातून बाहेर पडले होते. हा संदर्भ गणात्रा यांच्यावतीने न्यायालयाला देण्यात आला. हा पुरावा ग्राह्य धरत न्यालयाने विकी गणात्रा यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील आमदार गायकवाड हे तळोजा येथील तुरूंगात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news