ठाणे : भिवंडीत दोन दिवसात दोन मुली गायब; अपहरणाचा गुन्हा दाखल

ठाणे : भिवंडीत दोन दिवसात दोन मुली गायब; अपहरणाचा गुन्हा दाखल
भिवंडी
भिवंडीत दोन दिवसात दोन मुली गायबfile photo
Published on
Updated on

भिवंडी : देशात व राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच भिवंडीत वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवसात दोन अल्पवयीन मुली हरवल्याच्या घटना घडल्या असून या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईबाबा मंदिर परिसरातील स्टेम वॉटर सप्लायर्स परिसरातून एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मंगळवार (दि.10) सकाळी 6:30 ते 11:30 वाजेच्या सुमारास गाळ्यातून कोणीतरी फूस लावून अज्ञात कारणाकरिता पळवून नेले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या घटनेत 16 वर्षे 4 महिने वयाची अल्पवयीन मुलगी रामनगर, अंजुरफाटा येथून मंगळवार (दि.10) सायंकाळी सहा वाजता घराबाहेर गेली. ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी तक्रार दिल्याने नारपोली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news