

कल्याण (ठाणे) : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करून १०० हून अधिक अतिरेक्याना कंठस्नान घातले. भारतीय सैन्य दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्याचे आभार मानण्यासाठी तसेच भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर रविवार (दि.१८) रोजी डोंबिवलीत तिरंगा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीत सेवानिवृत्त सैनिक तसेच हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन
भारत माता की जय... चा केला जयघोष
नारी के स्वाभिमान में, सेना है मैदान में.... ,
सिन्दुर का सन्मान आतंक का विनाश...
असे महिलांच्या हातातील फलक सर्वाचे लक्ष वेधीत होते. डोंबिवली पूर्वेकडील गणेश मंदिर पासून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या सुरुवातीला एनसीसी कॅडेट संचलन करत होते. सेवानिवृत्त माजी सैनिक त्याच्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील भाजपा व शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे पदाधिकारी आजी माजी आमदार, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, मितेश पेणकर, कर्ण जाधव, धनाजी पाटील, प्रकाश पवार, शिवसेना आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक संजय पावशे, गजाजन पाटील, सागर जेधे,विवेक खामकर, गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे, कविता गावंड तेजस पाटील, संजय निक्ते यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. तिरंगा रॅलीत हजारो डोंबिवलीकर हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय... घोषणा देत सहभागी झाले होते. त्यामुळे रॅलीतील संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
नारी के स्वाभिमान में, सेना है मैदान में.... , सिन्दुर का सन्मान आतंक का विनाश...,और नहीं सहेगा भारत, पाक फतेह करेगा भारत... अशा आशयाचे तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या महिलांच्या व नागरिकांच्या हातातील फलकाने सर्वाचे लक्ष वेधलेा. तिरंगा रॅलीची सांगता डोंबिवली क्रीडा संकलन नजीकच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद कॅप्टन विनयकुमार स्मारकाला मानवंदना देऊन राष्ट्रगीता नंतर तिरंगा रॅली सांगता झाली.