

कसारा: मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळतांना बालंबाल बचावली आहे. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटत बस दरीत कोसळताना बस बचावली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही बस मुंबईहून संभाजी नगर येथे जात असताना महामार्गावरील कसारा घाटतील आंबा पाॅईट जवळ रस्ता खचला आहे. त्या ठिकाणी बस स्लीप झाली. नशीब चांगले होते म्हणून बस दरीत कोसळली नाही. ही बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
रविवार (दि.29) रोजी सकाळी मुंबईहून संभाजी नगर येथे जात असताना महामार्गावरील कसारा घाटातील आंबा पाॅईट जवळ रस्ता खचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या खचलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र अद्याप कसारा घाटतील खचलेल्या रस्त्याचे काम पूर्णात्वास आलेले नाही. हे काम सुरू असलेल्या ठिकाणी बस आली असता बसच्या मागील चाके खचलेल्या रस्त्यात रुतली. त्यामुळे बस मागे आली व बसची दोन चाके खचलेल्या रस्त्यात अडकली परिणामी बस चालकाने प्रसंगावधन राखत बस जागीच थांबवली आहे. बसचा आपघात होत असल्याचे लक्षात येताच बस मधील प्रवासी बस मधून त्वरा खाली उतरले. या अपघतात कोणीही जखमी नसून अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य शरद काळे, देवा वाघ, जसंविंदर सिंग, बाळू मांगे, रफिक शेख यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरु केले आहे. दरम्यान, कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उमेश चौधरी, पोलीस हवालदार माळी, महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घाटातील वाहतूक कोंडी सोडवली आहे.
50 सीट ची क्षमता असलेल्या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. बस रविवार (दि.29) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई नाशिक लेनवरील कसारा घाटातून मार्गस्थ होत असताना घाटात दोन वर्षापासून खचलेल्या रस्त्याजवळून ये- जा करत आहे. मात्र रविवार (दि.29) रोजी बस जात असताना बसच्या मागील चाक अचानक खचलेल्या रस्त्यात अडकले. त्यामुळे बस पुढे जाईना, चालकाने बस पुढे घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर बस पुढे न जाता मागे सरकली व खोल खचलेल्या ठिकाणी एका लोखंडी पोल जवळ अडकली. त्यामुळे भयभीत झालेले गाडीतील प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी बस मधून बाहेर पडले. बस चालकाने प्रसंगावधन राखत बस थांबवली नसती व खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी असलेल्या लोखंडी वस्तूअभावी बस प्रवासी घेऊन थेट दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता.
...दोन वर्षा पासून सुरु असलेले काम संथ गतीने सुरु आहे. करोडो रुपये खर्च करून सुरु असलेल्या या घाटातील नादुरुस्त रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने नेमलेल्या ठेकेदाराकडून होत असलेल्या बेजबाबदारपणा मुळे मुंबई, नाशिक महामार्गांवरील कसारा घाट सद्या डेंजर झोनमध्ये आहे. या बेजबाबदार ठेकेदार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.