ठाणे : पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण करणारे तिघे अटकेत

सहा तासात बाळ पुन्हा आईच्या कुशीत
ठाणे पोलीस स्टेशन
पुला खाली आसरा घेतलेल्या परिवारातील 5 महिन्याचे बाळ पळवणार्‍या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी गजाआड केले आहे.pudhari news network
Published on
Updated on

ठाणे : पुला खाली आसरा घेतलेल्या परिवारातील 5 महिन्याचे बाळ पळवणार्‍या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. तिघांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हे बाळ आईच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाण्या-मुंबईतून लहान बाळ चोरी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दरम्यान, ठाण्यातील जेल तलावसमोरील ब्रिज खाली आसरा घेतलेल्या एका गरीब कुटुंबातील 5 महिन्याचे बाळ अज्ञात इसमाने अपहरण करून नेल्याची घटना शनिवारी पहाटे समोर आली. बाळाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अपहरण कर्त्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढत त्यांना ताब्यात घेतले. तिघांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका करून हे बाळ आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. जावेद अजमत अली न्हावी (35 ), जयश्री नाईक (45), सुरेखा खंडागळे (34 ) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news