ठाणे : डोंबिवलीच्या खाद्य संस्कृतीसाठी घेतले जाताहेत वृक्षांचे बळी

डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावरील धक्कादायक प्रकार; तक्रारींची निवेदने धूळखात
डोंबिवली-अंबरनाथ महामार्ग, ठाणे
डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावर वृक्षांचे बळी घेतले जात आहेत.pudhari news network
Published on
Updated on
नेवाळी : शुभम साळुंके

प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवली भागाला मुक्त करण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावर सर्वाधिक वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र डोंबिवलीत परप्रांतीयांची डोंबिवली खाद्य संस्कृती दिसावी यासाठी वृक्षांचे बळी घेण्यात आले आहेत. या प्रकाराकडे कोणत्याही शासकीय यंत्रणांकडून काणाडोळा सुरू राहील आहे.

डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्गाच्या कडेला महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र या वृक्षांवर सध्या अतिक्रमण धारकांची नजर पडली आहे. महामार्गाच्या कडेला खाद्य पदार्थांची वाहन उभी करण्यासाठी वृक्षांचे बळी घेतले जात आहेत. श्री सदस्यांनी वृक्षांची लागवड केल्यानंतर त्यांची वाढ होई पर्यंत जोपासना केली होती. मात्र आता वृक्षांची वाढ झालेली असताना त्यांच्यावर अतिक्रमण धारकांची नजर पडली आहे. या वृक्षांवर सुरू असलेल्या विष प्रयोगाच्या तक्रारी एमआयडीसी सह स्थानिक लोकप्रतिनिधींकडे करण्यात आल्या आहेत.मात्र श्री सदस्यांच्या तक्रारी प्रशासकीय यंत्रणांसह लोकप्रतिनिधींकडे धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे श्री सदस्यांकडून लोकप्रतिनिधींच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे.

डोंबिवली पाईपलाईन महामार्गासोबत जवळील उंबार्ली टेकडीवर श्री सदस्यांनी वृक्ष लागवड केली आहे. त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी हे भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात श्री सदस्यांनी लागवड केलेल्या वृक्षांचे घेतलेले जीव त्यांना प्रशासन दाखवणार का ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

एमआयडीसीच्या जागेत सुरू असलेले अतिक्रमण प्रशासनाच्या दुर्लक्षित राहील आहे.मात्र प्रशासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे सध्या वृक्ष आपले जीव गमावत आहेत. प्रशासनाकडून आवश्यकता असणार्‍या ठिकाणी कारवाईचा दिखावा केला जात असल्याने सध्या श्री सदस्य लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांवर प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे या अतिक्रमण धारकांवर कारवाई साठी एमआयडीसी ला कधीचा मुहूर्त मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काटई नाका - बदलापूर महामार्ग वरील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत काही वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते आणि झाडं 20-25 फूट उंच झाली आहेत. त्यांची जोपासना संस्थेतर्फे करण्यात येते पण मागील काही वर्षात महामार्गाच्या कामामुळे, केबल वाहिन्या वाढत्या ढाबा संस्कृतीमुळे, फळांच्या स्टॉल विक्रेत्यांकडून झाडांची छाटणी करण्यात येते, काही झाडं मुळासकट उखडून टाकण्यात आली, झाडांवर एलईडी लायटिंग, फोकस लावण्यात आले आहेत. त्यामुळे झाडांवरील पक्षांना त्याचा त्रास होतो आणि याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष झाले आहे, हे लवकर थांबले पाहिजे.

मंगेश बाळू कोयंडे , निसर्गप्रेमी,डोंबिवली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news