ठाणे : तळवली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गुढ कायम

शाळेत चक्कर आल्याने रुग्णालयात केले होते दाखल
dead body
मृतदेहाचे गुढ वाढतेयfile photo
Published on
Updated on

टोकावडे : टोकावडे-मुरबाड तालुक्यातील तळवली बारागांव येथील आश्रमशाळेतील तिसरीच्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.17) रोजी घडली आहे.

हा विद्यार्थी अनुदानित आश्रम शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता. शनिवारी (दि.17)सकाळी शाळेमध्ये त्याला अचानक चक्कर आली. मात्र त्यानंतर त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यामुळे या विद्यार्थाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे स्पष्ट झाले नसल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा तळवली बारागांव या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा सोहम राऊत (वय 9 वर्षे) या विद्यार्थ्याला शनिवारी सकाळी शाळेत अचानक चक्कर आली म्हणून शाळेतील शिक्षकांनी त्याला ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधिकरी शंकर सुतार यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र ऑक्सिजन लेवल खूपच कमी झाल्याने त्याच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी 108 अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून उल्हासनगर येथे पाठवले होते. परंतु रस्त्यात त्याची तब्येत अधिकच खालावल्यामुळे शिक्षकांनी गोवेली ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो दगावला असल्याचे सांगितले.

सोहमचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला यासाठी उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह सिव्हील हॉस्पीटल ठाणे येथे पाठवण्यात आला. तपासणीनंतर सोहमच्या मृत्यूमागे कोणते कारण आहे, हे स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्याच्या उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नाशिक येथे त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे शिक्षकांनी सांगितले. याबाबत अधिक माहितीसाठी योगेंद्र वेखंडे मुख्याध्यापक माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा तळवली बारागांव यांच्याशी संपर्क साधला असता सोहम तिसरीत होता. तो आजारी नव्हता. परंतु काय झाले कळले नाही. त्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचे त्यांनी पुढारीशी बोलतांना सांगितले.

शनिवारी सकाळी सोहम राऊत हा इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी अचानक आजारी पडला म्हणून आम्ही त्याला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात घेऊ न गेलो. तेथे डॉक्टरांनी तपासून उल्हासनगर येथे पाठवले; परंतु रस्त्यात त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने आम्ही त्याला गोवेली ग्रामीण रुग्णालयात घेऊ न गेलो. परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता सोहम हा मृत झाला होता.

एन. के. विशे, मुख्याध्यापक, प्रा. अनुदानित आश्रमशाळा तळवली बारागांव

शनिवारी सकाळी सोहम या बारागांव तळवली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्याला उल्हासनगर येथे पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले होते.

डॉ. शंकर सुतार, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय टोकावडे

बारागांव तळवली या आश्रमशाळेची तपासणी केली असता संशयास्पद असे काही आढळून आले नाही.

दिनकर चकोर, स. पो. निरीक्षक, टोकावडे पोलीस ठाणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news