ठाणे : धावत्या दुचाकीच्या बॅटरीचा झाला स्फोट

Battery Explodes : सुदैवाने दुचाकीस्वार बचावला दुचाकी आगीत खाक
इलेक्ट्रिक स्कूटर
इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट होऊन अचानक आग लागलीpudhari news network
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील कोपर पुलावर एका इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

कोपरी पुलावर धावत्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घडलेल्या या घटनेत दुचाकीवरील स्वार सुदैवाने थोडक्यात बचावला. दरम्यान ही आगीची घटना बॅटरीच्या स्फोटामुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुचाकीला आग लागल्याची ही माहिती समजताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पुलावर धावत्या दुचाकीला आग लागल्याचे पाहताच या पुलावरून धावणाऱ्या अन्य वाहनांचा वेग कमी करून वाहनचालकांनी खबरदारी घेतली. दुचाकीला लागलेल्या आगीत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी यावेळी काही वेळातच दुचाकीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र या आगीमध्ये नवी कोरी दुचाकी पूर्णतः भस्मसात झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news