

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवाशी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. यावेळी एक छोटे बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई चालत होते. यावेळी अचानक त्या काकांच्या हातून चार महिनांचे बाळ नाल्यातील पाण्यात पडले. ही दुर्दैवी घटना आज (दि. १९) दुपारी ३ च्या सुमारास घडली. यावेळी बाळाच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता.