Thane Tembhi Naka Traffic Diversion: नवरात्रौत्सवानिमित्त ठाण्यात वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते?

भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग; अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना निर्बंधातून सूट
Thane Tembhi Naka Traffic Diversion
Thane Tembhi Naka Traffic DiversionPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका नवरात्रौत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे निर्बंध रविवार

४ ऑक्टोबरपासून ते २० ऑक्टोबर या कालावधीत २४ तास लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी या दरम्यान संबंधित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टेंभी नाका नवरात्रौत्सवाला या परिसरात होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात टेंभी नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Thane Tembhi Naka Traffic Diversion
2027 Calendar: पुढील वर्षी सप्टेंबरमध्येच गणपती- नवरात्री... 2004 नंतर पहिल्यांदाच घडलं; 5 सुट्ट्यांवरही सोडावे लागणार पाणी

दरम्यान, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

ही वाहतूक अधिसूचना ४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत २४ तास लागू राहणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

चरईकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

चरईकडून एदलजी रोडमार्गे भवानी चौक आणि टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धोबी आळी क्रॉस, फेअर अपार्टमेंट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

ही वाहने धोबी आळी क्रॉसपर्यंत सरळ जाऊन डावीकडे वळतील. त्यानंतर धोबी आळी चौक, धोबी आळी मशीद, सिव्हिल हॉस्पिटलमार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

Thane Tembhi Naka Traffic Diversion
Raigad Fort Search Operation: रायगड किल्ल्यावर बेपत्ता तरुणाचा शोध संपला; ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा ठाव

सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना निर्बंध...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड तसेच मीनाताई ठाकरे चौकाकडून सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नर मार्गे टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांनी सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नर येथून जीपीओ मार्गे कोर्टनाका सर्कल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

ठाणे स्टेशनकडून येणाऱ्या वाहनांसाठी बदल...

ठाणे स्टेशन येथून टॉवर नाका तसेच दगडी शाळा चौकाच्या बाजूने वीर सावरकर रोडमार्गे टेंभी नाका आणि पुढे सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना, तसेच टीएमटी व एसटी बसेसनाही टेंभी नाका सुजय हॉटेल कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने टेंभी नाका सुजय हॉटेल कट येथून उजवीकडे वळून ठाणे महापालिका शाळा क्रमांक १७ मार्गे कोर्टनाका सर्कल आणि पुढे इच्छितस्थळी जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news