Comrades Ultra Marathon
तहसीलदार युवराज बांगरpudhari photo

Thane News : दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत तहसीलदार युवराज बांगर यांचा जागतिक विक्रम

जगातील सर्वात जुनी आणि खडतर म्हणून कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ओळखली जाते.
Published on

ठाणे : दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ स्पर्धेत ठाण्यातील तहसीलदार युवराज बांगर यांनी जागतिक विक्रम केला. दक्षिण आफ्रिकेत 1921 पासून सुरू झालेल्या जगातील सर्वात जुनी आणि खडतर म्हणून कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ओळखली जाते. या स्पर्धेत जगभरातून अनेक अल्ट्रा रनर सहभागी होत असतात. या स्पर्धेत 90 किलोमीटरचा डोंगराळ, उंच सखल भागाचा समावेश असून स्पर्धेदरम्यान वातावरणीय बदल होत असतात.

8 जून रोजी संपन्न झालेल्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन 2025 या स्पर्धेचे 98 वे वर्ष होते. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील पिटर मॉरिटस बर्ग ते डर्बन अशी स्पर्धेचे 90 किमी अंतर होते. तसेच हे अंतर 12 तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे अनिवार्य असून या स्पर्धेत पाच ठिकाणी थरारक कट ऑफ देखील आहेत.

जगभरातून 85 देशातील 25000 हून अधिक अल्ट्रा रनर स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यात दक्षिण आफ्रिका पहिल्या तर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. या वर्षी भारतामधून 395 अल्ट्रा रनर सहभागी झाले होते त्यापैकी 330 स्पर्धकांनी यशस्वीरित्या नियोजित वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली.

युवराज बांगर महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. बांगर यांनी ठाण्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजातून होणारा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी बांगर यांनी रनिंगचा छंद जोपासला. यातून पुढे ठाणे, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, लोणावळ्यात होणार्‍या विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पारितोषिके, मेडल्स पटकावले आहेत. तसेच महसूल विभागाकडून होणार्‍या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये हिरीरिने सहभाग घेत असतात.

तहसीलदार युवराज बांगर यांनी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन 2025 स्पर्धेतील आव्हानात्मक अंतर 11तास 32 मिनिटात पूर्ण करून जागतिक पातळीवर अल्ट्रा रनरचा नवीन विक्रम केला आहे. जे क्रीडाप्रेमी धावपटू असतात त्यांना एकदा तरी या खडतर स्पर्धेचा थरारक अनुभव घ्यायची इच्छा असते. त्याप्रमाणे यांनी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन 2025 मध्ये सहभाग घेऊ न ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याचा तसेच अद्भुत अनुभव घेण्याची मनोकामना पूर्ण केल्याचा आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे तहसीलदार युवराज बांगर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news