

ठाणे : शुभम साळुंके
डोंबिवली नंतर ठाणे मनपा क्षेत्रातील शिळफाटा परिसरातील अनधिकृत बांधकाम चर्चेत आली आहेत. शासनाच्या आरक्षित जमिनींवर अतिक्रमण झाल्याने शासकीय कार्यालय भाड्याच्या खोलीत सुरू करण्याची नामुष्की शासकीय यंत्रणांवर आली आहे. त्यामुळे डोंबिवली नंतर शिळफाटा परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील शिळफाटा परिसरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे. लकी कंपाऊंड दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण झाली असली तरी यानंतर देखील अनधिकृत बांधकामांना आळा बसलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयात ठाणे महानगरपालिकेने शिळं भागात ५२ अनधिकृत इमारती असल्याची माहिती दिली आहे. याहून अधिक बेकायदा इमारतीचे काम सुरू असून त्याकडेही ठाणे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी दक्ष नागरिक संघटेनचे शरद पाटील, वैशाली भोसले,आणि संतोष भोईर यांनी पत्रकार परिषद घेत पालिका प्रशासनाकडे केली होती, यानंतर महापालिकेने एका अनधिकृत इमारती करावाई केली, मात्र इतर अनधिकृत बांधकाम करावाई कधी करणार असा आता उपस्थिती केला जात असून मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी प्रशासनावर झोड घेतली असून पालिकेने दिव्यातील आणि शीळफाटा परिसरातील अनधिकृत बांधकामावर करावाई करावी.
दरम्यान राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी कित्येक बांधकामाबद्दल तक्रारी केल्या आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु कथित अधिकारी आहे ना तिथला, तो सर्वात भ्रष्ट आहे..दिव्यातील लोक म्हणतात स्लॅब पाठी ३ लाख जातात त्यात यांचा वाटा असतो, असा आरोप पाटील यांनी करत पालिकेने अनधिकृत बांधकामावर करावाई करावी,अशी मागणीही केली आहे. दरम्यान आता महापालिका अनधिकृत बांधकावर करावाई करणार का ? हे पहावे लागेल.