ठाणे : कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्वानांचा उच्छाद: पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त

मोहने गावठाणातील फुलेनगर परिसरात आठ जणांना चावा, दोन लहान मुले गंभीर जखमी
ठाणे
भटके श्वानPudhari News Network
Published on
Updated on

टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रा अंतर्गत येणार्‍या प्रभाग क्रमांक 13 मोहने गावठाण फुलेनगरमध्ये भटक्या श्वानांनी तब्बल आठ जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. रविवार (दि.23) रोजी अ प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 13, मोहने गावठाण परिसरातील फुलेनगर येथे एका भटक्या श्वानाने आठ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Summary

आरोग्य विभागामार्फत भटक्या श्वानांना नियंत्रण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे शहरातील भटक्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही संबंधित ठेकेदार आणि पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

महानगरपालिका प्रशासनाकडून ठेकेदारांना नियमितपणे देयके अदा केली जात नसल्याची माहिती यावेळी श्वानपथक पथकातील कर्मचारी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भटक्या श्वानांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट, हे श्वान अधिक आक्रमक होत असून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फुलेनगर येथे घडलेल्या घटनेत एका भटक्या श्वानाने आठ जणांना चावा घेतलेल्या घटनेत जखमी नागरिकांची नावे: विपुल आटूदे (वय 8 वर्षे) हस्नान शेख (वय 1.5 वर्षे) देवराम भालसे संतोष खेडे, मनोहर वाघमारे अन्य दोन अज्ञात इसम या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

फुलेनगर परिसरातील रहिवाशांनी या समस्येबाबत महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत, परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, वृद्ध आणि महिला दहशतीत असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे.

डिसेंबर महिन्यात टिटवाळा येथील एका गृहसंकुलाच्या परिसरात भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात एका साठ वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात होते.

पालिकेकडून नेमण्यात आलेल्या ठेकेदाराने भटक्या श्वानांना पकडून निर्बंध घालण्यासाठी विशिष्ट कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठेकेदाराकडून नियमित कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिक वारंवार तक्रारी करत असले तरी, संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी तातडीने मोहीम हाती घेण्यात यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने तातडीने भटक्या श्वानांवर नियंत्रण आणण्याची ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.याबाबत डॉ. दीपा शुक्ला वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता . झालेल्या घटनेबाबत मी माहिती घेऊन तातडीने श्वानपथकाला पाठवले असून चावा घेतलेल्या श्वानांचा शोध सुरू आहे. याबाबत जीव रक्षा संस्थेकडे भटक्या श्वानांच्या बाबत काम करण्यासाठी ठेका दिलेला आहे. त्यांच्या रखडलेल्या बिलाबाबत विचारणा केली असता पेमेंट रखडल्याची त्यांनी कबुली दिली . मात्र त्यांचे कांम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत तातडीची मिटिंग घेऊन याबाबत निर्णय घेतलां जाईल असे त्यांनी सांगितले. श्वानांच्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी प्रशासनाकडे भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news