Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकरांच्या कार्यालयातून महत्वाचे दस्तावेज ताब्यात; हत्येमागील नेमके कारण येणार समोर?

पूर्णेकरांचा ड्रग्ज माफिया, बेकायदेशीर बांधकाम व राजकीय नेत्यांच्या गैर कारभाराविरोधात शासन दरबारी पाठपुरावा
Thane SIT Investigation
Pradeep Purnekar CasePudhari
Published on: 
Updated on: 

Thane SIT Investigation

ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून एसआयटी तपास पथकाने शुक्रवारी (दि.२) सायंकाळी घटनास्थळी असलेल्या पूर्णेकर यांच्या कार्यालयाची पुन्हा पडताळणी केली. यावेळी काही महत्वाचे दस्तावेज पथकाने ताब्यात घेतले.

मंगळवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून काही मारेकऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून आणि धारदार हत्याराने वार करुन निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पप्या शिंदे, निखिल यादव व नितेश पवार या तिघा मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतल्या तिघा आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Thane SIT Investigation
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; पळून जात असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक

दरम्यान, या घटनेचा तपास करीत असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी पूर्णेकर यांच्या कार्यालयाची फेरतपासणी केली. यावेळी काही पुरावे व महत्वाचे दस्तावेज पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतले. तर घटनास्थळी असलेल्या आसपासच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. पूर्णेकर यांच्या कार्यालया जवळील एका ज्वेलर्स दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये मारेकऱ्यांच्या हालचाली चित्रित झाल्या आहेत. हे फुटेज देखील पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.

पाठपुरावा करणारे दस्तावेज

पूर्णेकर हे परिसरातील ड्रग्ज माफिया, बेकायदेशीर बांधकाम व राजकीय नेत्यांच्या गैर कारभाराविरोधात शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. त्या सर्व पाठपुराव्यांचे दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पूर्णेकरांच्या हत्ये मागे नेमके कारण काय? अन कोणी ही हत्या घडवून आणली याचा आता पोलीस कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news