Thane SIR Voter Verification: एसआयआर मोहिमेत ग्रामीण भाग आघाडीवर

राज्याच्या ग्रामीण भागात ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांचे डिजिटायझेशन
voter verification
voter verificationPudhari
Published on
Updated on

ठाणे: विशेष मतदार सखोल पुनरिक्षण मोहीम अर्थात एसआरआय मोहिमेत ग्रामीण भाग आघाडीवर असल्याचे राज्यात चित्र आहे. जेवढा प्रतिसाद हा शहरी भागात मिळायला हवा होता तेवढा प्रतिसाद ग्रामीण भागातील मतदारांकडून मिळत असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे डिजिटायझेशन झाले आहे. तर शहरी भागात हे प्रमाण ५० टक्के सुद्धा नाही. त्यामुळे शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात या एसआयआर मोहिमेचा उत्साह अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सुरू असलेल्या ‘एसआयआर’च्या कामाला नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये या कामाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक गावांमध्ये नागरिक आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून या मोहिमेला गती मिळत आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्रात ‘एसआयआर’च्या कामाबाबत अधिक उत्साह दिसून येत आहे.

राज्यातील शहरी भागातही ‘एसआयआर’च्या कामाला प्रतिसाद मिळत असला, स्थलांतर, एसआयआर मोहिमेच्या संदर्भातील उदासीनता आणि वेळेत नागरिक उपलब्ध होत नसल्याने फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने शहरी भागात काही प्रमाणात या मोहिमेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

त्या तुलनेने ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग अधिक असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर नागरिक, ग्रामपंचायती आणि प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे तुलनेने ही मोहीम अधिक पुढे जाण्याची शक्यता आहे.

राज्यात आतापर्यंत ८८ टक्क्यांवर अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ६५ टक्क्यांपेक्षा नमुने हे डिजिटायझेशन करण्यात आले आहेत. शहरी भागांचा विचार केल्यास मुंबई उपनगरात डिजिटायझेसधनचे प्रमाण प्रमाणात ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, ठाणे शहरात हे प्रमाण ४० टक्क्यांवर आहे,मुंबई शहर ४० टक्के ,पालघर ४० तर पुणे ४५ टक्के आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

त्यामुळे शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात या मोहिमेचा वेग अधिक असून येत्या १७ ऑगस्ट पर्यंत ग्रामीण भागातील डिजिटायझेशनचे काम १०० टक्के पूर्ण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news